नवी दिल्ली -पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ ( Punjab Assembly Election 2022 ) आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) यांनी डॉ. कुमार विश्वास ( Dr. Kumar Vishwas ) यांच्या 'खलिस्तान' ( kejriwal khalistan Issue) संबंधित वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. कुमार विश्वास, राहुल-प्रियांका आणि पीएम मोदी ( Rahul-Priyanka and PM Modi ) यांच्या आरोपांबाबत केजरीवाल म्हणाले की, सर्व विधाने हास्यास्पद आहेत. यामध्ये एक पॅटर्न दिसत असल्याचे केजरीवाल म्हणाले. त्यांनी पंजाबच्या भटिंडा येथून एक व्हिडिओत म्हटले आहे की, 10 वर्षांपासून एक आतंकवादी देशाविरुद्ध कट रचत आहे आणि अचानक सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांऐवजी कवीला त्याच्याबद्दल कळते, हा विचार करून मला हसू येते, असेही केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले, त्यांना वाटते की, ते जगातील सर्वात गोड आतंकवादी असेल, जे लोकांसाठी रुग्णालये आणि शाळा बांधतो. पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींची नक्कल केल्याचे कदाचित पहिल्यांदाच घडले आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पंतप्रधानांनी वक्तव्य केले. त्यापूर्वीच एका कवीने आधार नसलेली कविता ऐकवली. असेही केजरीवाल म्हणाले. आरोप-प्रत्यारोप होतच राहतील, पण या लोकांनी देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडले आहे. 10 वर्षांपासून ते दिल्लीचे मुख्यमंत्री आतंकवादी असल्याचे सांगत आहेत. सर्व एजन्सींनी माझ्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले, एकाही एजन्सीला त्याची माहिती मिळाली नाही. एक दिवशी एका कवीने कविता ऐकवली, तेव्हा अचानक देशाच्या पंतप्रधानांना समजले, अरे बाप रे! एवढा मोठा दहशतवादी माझ्याच शहरात राहत होता, हे मला माहीत नव्हते, कवीने कविता पाहिली हे बरे झाले. त्यांनी कविता लिहिली नसती तर देशात कोणालाच कळत नसते, असेही केजरीवाल म्हणाले.
सीएम केजरीवाल म्हणाले, संपूर्ण प्रकरणाचा क्रम बघा. आधी राहुल गांधींनी माझ्यावर आरोप केले. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान, प्रियंका गांधी आणि सुखबीर बादल यांनी तीच भाषा वापरून माझ्यावर आरोप केले. मला अनेकांनी सांगितले, लोक राहुल गांधींच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत, पण असाही दिवस येईल की पंतप्रधान मोदीही राहुल गांधींची नक्कल करतील, असे मला कधीच वाटले नव्हते. सर्व यंत्रणांनी माझ्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. कोणाला काही मिळाले नाही. केजरीवाल म्हणाले, एके दिवशी एका कवीने उभे राहून एक कविता सांगितली, त्या कवितेत त्यांनी म्हटले की, सात वर्षांपूर्वी केजरीवाल मला म्हणाले होते, देशाचे दोन तुकडे करू. तुम्ही एका तुकड्याचे पंतप्रधान व्हा, मी एका तुकड्याचा पंतप्रधान होईन. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांनी राहुल गांधींचे भाषण पाहिल्यावर एवढा मोठा आतंकवादी देशात फोफावत आहे, हे पंतप्रधानांना समजले. इतकं खोटं बोलणाऱ्या आतंकवाद्याला पकडणाऱ्या कवीला धन्यवाद. जे सर्व एजन्सी करता आले नाही. या लोकांनी देशाची एक नौटंकी केली आहे. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षांचे नेते देशाच्या सुरक्षेची चेष्टा करत आहेत.
केजरीवाल म्हणाले, त्यांना असे वाटते की दोन प्रकारचे आतंकवादी आहेत. एक जे लोकांमध्ये भीती पसरवतात, तर दुसरे जे भ्रष्टाचार्यांमध्ये भीती पसरवतात. आज सर्व भ्रष्ट आणि चोर-दरोडेखोर एकत्र आले आहेत. ते केजरीवालांना घाबरतात. या लोकांसाठी मी आतंकवादी आहे. ते रात्री झोपत नाहीत, झोपले तर मी त्यांच्या स्वप्नात येता, अशी टीकाही केजरीवाल यांनी केली आहे. शहीद-ए-आझम भगतसिंग यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, भगतसिंग यांचा जन्म 100 वर्षांपूर्वी झाला होता. ब्रिटिशांनी त्यांना आतंकवादी म्हटले. माझा भगतसिंगांवर खूप विश्वास आहे, मी स्वतःला त्यांचा शिष्य म्हणवतो. 100 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. भगतसिंगांच्या शिष्याला आतंकवादी सिद्ध करण्याचा प्रयत्न हे भष्ट्राचारी करत आहे, असेही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.