महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खंडवा लोकसभा पोटनिवडणूक : भाजपच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा विजय - etv bharat marathi

खंडवा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी अखेर बाजी मारली आहे. मतमोजणीत त्यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. त्यांनी विजयी होऊ, असा विश्वासही व्यक्त केला होता.

ज्ञानेश्वर पाटील
ज्ञानेश्वर पाटील

By

Published : Nov 2, 2021, 4:20 PM IST

Updated : Nov 2, 2021, 8:46 PM IST

भोपाळ (मध्य प्रदेश)-खंडवा लोकसभेची पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी विजय मिळविला आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी सुरुवातीला 54,547 मतांची आघाडी घेतली होती.

मध्यप्रदेशमधील तीन विधानसभा आणि लोकसभेची मतगणना झाली. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील हे मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचले होता. भाजपचे नेते ज्ञानेश्वर पाटील म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांची मेहनत पाहात भाजप ऐतिहासिक विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला होता. ते म्हणाले, की काँग्रेस पक्ष संपणार आहे. काँग्रेसचे मुंगेरीलाल हे गोड स्वप्ने पाहत आहेत. संपूर्ण लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांची जादू सुरू आहे. पुन्हा एकदा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार आहे, असे त्यांनी मतमोजणी करताना म्हटले होते.

Last Updated : Nov 2, 2021, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details