श्रीनगर - सैन्यदलाने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडरचा पुलवामा येथे खात्मा केला आहे. मोहम्मद इस्माल अल्वी उर्फ अदनान असे मृत दहशतवाद्याचे नाव आहे.
दनान दहशतवाद्याने 2019 मध्ये पुलावामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. त्यामध्ये 40 जवानांचा मृत्यू झाला होता. सैन्यदलाच्या हल्ल्यात ठार झालेला अदनान हा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरचा नातेवाईक होता. पोलिसांच्या माहितीनुसार अदनान हा पुलावामा येथे आत्मघातकी हल्ला घडवून आणणाऱ्या आदील दरबरोबर राहत होता. दरची व्हायरल क्लिप व्हायरल झाली होती.
हेही वाचा-मोठा घातपात टळला! राजौरी-पुंछ महामार्गावरील आयईडी बॉम्ब निकामी
गेल्या काही वर्षांपासून अदनान काश्मीरमध्ये होता सक्रिय-
काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत काश्मीर आयजीपी विजय कुमार यांचा संदर्भ घेऊन एन्काउन्टरची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले, की मोहम्मद इस्माल अल्वी हा मसूद अझहरच्या कुटुंबातील होता. हा आत्मघातकी हल्ले घडविण्यात सहभागी होता. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की अदनान भाई उर्फ लम्बू भाई हा पाकिस्तानमधील होता. आयईडी स्फोट तयार करण्यासाठी तो परिचित होता. गेल्या काही वर्षांपासून तो काश्मीरमध्ये सक्रिय होता.