तिरुवनंतपूरम - लग्न आणि लग्नाच्या वाढदिवस हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. याबद्दल लोकांना नेहमीच खूप आकर्षण असतं. आपला लग्नाचा वाढदिवस खास असावा यासाठी सगळेचजण वेगवेगळे प्लॅन्स करतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. अनेकदा आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी महिला आणि पुरूष काही हटके करता येईल का याचा विचार करतात. मात्र, केरळमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने लग्नाचा 50 वा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे.
केरळमधील कसारागोड येथील एका शेतकरी दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या लसीकरण मोहिमेला 50 हजार रुपयांची मदत केली आहे. थेक्केपल्लथ कुट्ट्यान पत्नी चिरुथा यांनी ही रक्कम उडुमा येथील सभासद सी.एच. कुंजंबू यांच्याकडे सोपवली.