कोची -केरळमधील संतोष जॉर्ज कुलंगारा हे फक्त एका राज्याचे नाही, तर संपूर्ण देशाची ओळख होणार आहेत. संतोष जार्ज हे अंतराळ प्रवास करणार आहेत. त्यांनी अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीच्या अंतराळ पर्यटन कार्यक्रमात आपले तिकीट बूक केले आहे. अंतराळ मिशनसाठी तिकीट बुक करणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत.
संतोष जॉर्ज कुलंगारा प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या 24 वर्षात त्यांनी 130 हून अधिक देशांचा प्रवास केला आहे. ते 'संचारम' (Sancharam) नावाचा एक कार्यक्रम चालवतात. 'संचारम' ने आतापर्यंत 1800 एपिसोड प्रसारित केले आहेत. संतोषने 2007 मध्ये अंतराळ प्रवासाचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा त्यांनी संधी मिळाली नव्हती. आता ते अवकाशाची सफर करणार आहेत. यात्रेची किंमत अंदाजे 2.5 लाख डॉलर (1.8 कोटी रुपये) आहे. संतोष आपला संपूर्ण प्रवास कॅमेर्यामध्ये कैद करणार आहेत.