तिरुवनंतपुरम - केरळमध्ये शनिवारी, रविवारी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे केरळमधील अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले होते. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी रविवारी सकाळी बेपत्ता नागरिकांचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
मदतीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत -
पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. नागरिकांच्या मदतीसाठी शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. या पावसाचा सर्वात जास्त फटका कोट्टायम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की या तीन जिल्ह्यांना बसला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट -