कोची - केरळात एप्रिलला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसप्रणीत यूडीएफने शनिवारी आपला जाहीरनामा ‘पीपल्स मॅनिफेस्टो’ जाहीर केला. नव्या घोषणापत्रानुसार, सर्व श्वेत कार्डधारकांना पाच किलो तांदूळ मोफत देण्याचे आणि गरीबांसाठी पाच लाख घरे बांधण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यूडीएफने शबरीमालाच्या भगवान अयप्पा मंदिराच्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि राजस्थानच्या धर्तीवर शांतता व सौहार्द विभाग तयार करण्याचे विशेष कायदे करण्याचे आश्वासनही जनतेला दिले आहे.
महिलांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या मातांना वयोमर्यादेत दोन वर्षाची सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनाने प्रभावित झालेल्या लोकांना मोफत फूड पॅकेट्स इत्यादी सुविधा देण्याचेही जाहीरनाम्यात म्हटलं आहे. सत्ताधारी एलडीएफने सामाजिक सुरक्षा पेन्शन 1600 रुपयांवरून वाढवून 2,500 रुपयांपर्यंत वाढविण्याबरोबरच रोजगार नसलेल्या गृहणींना पेन्शन देण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
केरळ विधानसभा निवडणूक -