महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विद्यार्थिनीला स्टेजवर बोलवल्याबद्दल केरळच्या मुस्लिम विद्वानांनी आयोजकांना फटकारले - Kerala Muslim Scholars to invite the girl

केरळमधील एका मुस्लिम विद्वानाने विद्यार्थिनीला स्टेजवर बोलावल्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजकांना फटकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या निर्णयाचा सोशल मीडियावर विरोध होत आहे.

पुरस्कार देताना
पुरस्कार देताना

By

Published : May 13, 2022, 10:04 AM IST

मलाप्पुरम (केरल) -सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक मुस्लिम विद्वान एका कार्यक्रमाच्या आयोजकांना फटकारताना दिसत आहे. या कारण, कार्यक्रमात एका विद्यार्थिनीला स्टेजवर आमंत्रित केल्याबद्दल एका मुस्लिम विद्वानाने नाराजी व्यक्त केली होती. या कारणास्तव, तो कार्यक्रमाच्या आयोजकांना फटकारताना दिसतो. त्यांच्या या निर्णयाचा सोशल मीडियावर तीव्र विरोध होत आहे. हा व्हिडिओही काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केला होता.


ही घटना नुकतीच जिल्ह्यातील एका मदरशाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी घडली, जिथे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते पनाक्कड सय्यद अब्बास अली शिहाब थांगल यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर लगेचच मुसलियार यांनी विद्यार्थ्याला मंचावर का बोलावले, असा सवाल आयोजकांना केला.

संतप्त झालेला मुसलियार आयोजकांना म्हणाला, 'दहावीच्या मुलीला स्टेजवर कोणी बोलावले... पुन्हा असे केले तर... अशा मुलींना इथे बोलवू नका... तुम्हाला समस्थाचे नियम माहीत नाहीत का?'... तीच्या पालकांना बक्षीस घेण्यसाठी मंचावर बोलवा असे सांगण्यात आले. आम्ही इथे बसलो असताना अशा गोष्टी करू नका असही ते म्हणाले.


या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन (एमएसएफ) च्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष फातिमा ताहलिया यांनी फेसबुकवर सांगितले की, मुलींना व्यासपीठावरून काढून टाकणे आणि त्यांचा अपमान करणे याचे समाजात दूरगामी परिणाम होतील. दरम्यान, एमएसएफचे प्रदेशाध्यक्ष पी.के. नवासने मुस्लियारला पाठिंबा दिला आणि त्यांच्यावरील हल्ल्यासाठी काही जातीयवादी घटकांना जबाबदार धरले. संपूर्ण नेतृत्वाविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -SFJ'ची हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा धमकी; मंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती देणाऱ्याला 25 हजार डॉलर्स

ABOUT THE AUTHOR

...view details