कासारगोड (केरळ) : केरळमध्ये कर्ज फेडण्यासाठी घर विक्री करण्यास निघालेल्या एका व्यक्तीला एक कोटींची लॉटरी लागली ( Kerala Lottery ) आहे. कासारगोडच्या मंजेश्वर शहरातील पावूर गावात राहणारे मोहम्मद बावा (५०) यांच्यावर ५० लाखांचे कर्ज होते. एवढेच नाही तर कर्ज फेडण्यासाठी बावाने घर विकण्याचा सौदाही फायनल केला होता. मात्र लॉटरीचा निकाल आल्यावर बावाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. ( Kerala Lottery Result )
अन् कर्जाखाली दबला :बावाने 8 महिन्यांपूर्वीच घर बांधले होते, जे 2 हजार स्क्वेअर फूटमध्ये आहे. बावा यांनी सांगितले की, ते कुटुंबासह भाड्याच्या घरात राहणार होते. घर हेच भांडवल उरले आहे. कुटुंबात पत्नी अॅनी आणि पाच मुले आहेत. मुलांमध्ये 4 मुली आणि एक मुलगा आहे. दोन मोठ्या मुलींचे लग्न झाले आहे. मुलींच्या लग्नात आणि घराच्या बांधकामात बावा कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता. त्याच्यावर बँक आणि नातेवाइकांचे 50 लाखांचे कर्ज होते.
केरळ: 50 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी विकणार होता घर, अचानक लागली एक कोटींची लॉटरी 37 लाखांचा कर कापला जाईल: बावा यांना कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी उडुपी जिल्ह्यातील होसांगडी गावात एमआर राजेश यांच्याकडून लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यास सुरुवात केली. ज्या दिवशी त्याच्या घराचा व्यवहार होणार होता, त्याच दिवशी सोडत उघडली. आपली लॉटरी लागल्याचे बावांना समजले. यानंतर त्यांनी घर विकण्याचा करार रद्द केला. 37 लाख रुपये कर वजा केल्यावर बावांना 1 कोटींपैकी 63 लाख रुपये मिळतील.
उरलेल्या पैशातून बावा लोकांना मदत करणार : बावा यांनी आता बक्षीस लॉटरीच्या रकमेचा धनादेश गेरुकट्टा सहकारी बँकेकडे सुपूर्द केला आहे. उरलेल्या पैशातून आपल्यासारख्या लोकांचे बँकेचे कर्ज फेडण्यास मदत करणार असल्याचे बावा सांगतात. लॉटरी जिंकल्याबद्दल देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना बावा म्हणाले की, हे भाग्यापेक्षा कमी नाही, माझ्या सर्व अडचणी संपल्या आहेत.
हेही वाचा :अबब! कोरोनाला हरविले अन् जिंकली 5 कोटींची लॉटरी...