एर्नाकुलम (केरळ) - केरळ उच्च न्यायालयाने प्रख्यात अभिनेत्री सनी लिओनीविरुद्धच्या (Sunny Leone) फसवणुकीच्या खटल्याला स्थगिती दिली आहे.(cheating case against Sunny Leone). अभिनेत्रीची याचिका मान्य करताना उच्च न्यायालयाने केरळ सरकार आणि गुन्हे शाखेला नोटीस पाठवली आहे. न्यायालय याचिकेवर दोन आठवड्यांत पुनर्विचार करेल.
Sunny Leone: सनी लिओनीविरुद्धच्या फसवणुकीच्या खटल्याला हायकोर्टाची स्थगिती
एर्नाकुलम येथील एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर सनी लिओनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (cheating case against Sunny Leone). त्या व्यक्तीने सनी लिओनीवर (Sunny Leone) 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता.
2019 मधील घटना -एर्नाकुलम येथील एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर सनी लिओनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या व्यक्तीने सनी लिओनीवर 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. स्टेज शोमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन देऊन 30 लाख घेतले, मात्र नंतर फसवणूक केली, असा आरोप सनी लिओनी वर करण्यात आला होता. याप्रकरणी 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. क्राइम ब्रँचने नोंदवलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या तिच्या याचिकेत सनी लिओनीने म्हटले आहे की, आयोजकांनी कराराचे उल्लंघन केले आहे आणि त्यामुळे हा खटला मागे घेण्यात यावा.