तिरुवनंतपुरम - केरळमध्ये शनिवारी धुव्वादार पावसाने हजेरी लागली होती. सर्वदूर झालेल्या पावसाने केरळमधील विविध नद्यांना पूर आले होते. या पूरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत आतापर्यंत 15 (कोट्टायम -12 आणि इडुक्की -3) जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले आहेत. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी आज (रविवारी) सकाळी भूस्खलनात बेपत्ता झालेल्या नागरिकांची शोधमोहिम चालू केली आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी मदत छावण्या -
आता मिळालेल्या माहितीनूसार, कोट्टायम, पथानामथिट्टा आणि इडुक्की जिल्ह्यात अजूनही पुराचे पाणी हे ओसरलेले नाही. पुराने प्रभापित झालेल्या जिल्ह्यातील घरांमध्ये अद्यापही पाणी भरलेले आहे अनेक घरांना तलावाचे स्वरूप आले आहे. प्रशासनाकडून पुराच्या पाण्याने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.
धरण प्रभावित क्षेत्रात रेड अलर्ट -
पुराने प्रभावित झालेल्या जिल्ह्यात जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झाले आहे. इडुक्की, कोट्टायम आणि पथानामथिट्टा या भागातील नागरिकांना वीज आणि अन्य असुविधांचा सामना करावा लागत आहे. अलाप्पुझा जिल्ह्यात लगातार दुसऱ्या दिवशी ही जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच, केरळ राज्य सरकार ने राज्यात धरण प्रभावित क्षेत्रात रेड अलर्ट लागू केला आहे. कारणकी, राज्यातील मोठ्या प्रमाणात धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत.