महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळ विधानसभेत आज मतदान, भाजपला यश येणार का?

केरळ विधानसभेत 140 जागांसाठी आज 6 एप्रिल 2021 ला मतदान पार पडले. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. वाचा हा स्पेशल रिपोर्ट...

kerala assembly election 2021
kerala assembly election 2021

By

Published : Apr 6, 2021, 5:53 AM IST

तिरुअनंतपुरम - केरळ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. केरळ विधानसभेत 140 जागांसाठी आज 6 एप्रिल 2021 ला मतदान पार पडले. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. केरळमधील सर्व 140 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. केरळमध्ये अनुसूचित जातींसाठी 14 आणि अनुसूचित जमातीसाठी 2 जागा राखीव आहेत.

40 हजार 771 मतदान केंद्रावर होणार मतदान

140 जागांसाठी एकूण 957 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 381 उमेदवार राष्ट्रीय आणि 52 उमेदवार प्रादेशिक पक्षांचे आहेत. तर 206 उमेदवार नोंदणीकृत अपरिचित पक्षाचे आहेत. केरळ निवडणुकीत 318 अपक्षही आपले नशीब आजमावत आहेत.

केरळात 140 जागांसाठी मतदान

राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजपाने 107 आणि काँग्रेसने 87 उमेदवारांना तिकिट दिले आहे. त्याचबरोबर सीपीएम आणि बसपाने 72-72 उमेदवार उभे केले आहेत. या वेळी 104 महिला उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही केवळ 104 महिला रिंगणात होत्या.

जाणून घ्या केरळ विधानसभा निवडणुकीविषयी

2,74,46,039 मतदार बजावणार मतदानाचा हक्क -

केरळाच्या 14 जिल्ह्यातील 140 विधानसभा मतदारसंघात मतदाता आपला हक्क बजावतील. केरळमध्ये 2,74,46,039 मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी 1,32,83,724 पुरुष आणि 1,41,62,025 महिला मतदार आहेत, तर 290 तृतीय लिंग मतदारही मतदान करतील. मतदानासाठी केरळमध्ये मतदान 40,771 केंद्रे उभारण्यात आली आहेत.

सत्ता टिकवण्याचे आव्हान -

केरळमधील सत्ता टिकवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. केरळमध्ये सध्या सीपीएमच्या नेतृत्वात डाव्या आघाडीचे सरकार आहे. माजी संरक्षणमंत्री आणि तीनदा केरळचे मुख्यमंत्री राहिलेले एके अँटनी यांनी यावेळी काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) सरकार स्थापन करण्याची आशा व्यक्त केली आहे. दुसरीकडे, केरळ विधानसभेत भाजपाकडे फक्त एकच आमदार असला तरी, यावेळी भाजपाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. भाजपा अनेकांचा खेळ खराब करू शकते, असे तज्ज्ञांचा मत आहे.

या निवडणुकीत अनेक मोठ्या चेहऱ्याची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. भाजपा, काँग्रेस व इतर पक्षातील नेते विजयाचा दावा करीत आहेत. मुख्यमंत्री पी विजयन यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना पुढे करून भाजपानं मोठी राजकीय खेळी केली आहे. तसेच के. सुरेंद्रराम ते ओमान चांडी आणि कुम्मनम राजशेखरन हे सध्याच्या सरकारचे मोठ्या आज मैदानात आहेत.

मागील निवडणूकीतील संख्याबळ -

केरळ विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एलडीएफने (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) 91 जागांवर विजय मिळवला होता. यूडीएफने (संयुक्त लोकशाही आघाडी) 47 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपने एकूण 98 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.

हेही वाचा -'महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार' रविशंकर प्रसाद यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details