रुद्रप्रयाग ( उत्तराखंड ) - केदारनाथची पंचमुखी उत्सव डोली गौरीकुंड ( Panchmukhi Utsav Doli of Kedarnath ) येथून गुरुवारी निघाली. विविध टप्पे पार करून केदारपुरीत पोहोचली. जवळपास 10 हजार यात्रेकरूही डोलीसह केदारनाथला ( Kedarnath Dham ) पोहोचले आहेत.
बाबा केदारनाथ मंदिरामध्ये जाण्यासाठी ( Kedarnath temple decoration ) प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साह आहे. बाबा केदारचे मंदिर 12 क्विंटल फुलांनी ( 12 quintals of flowers) ) सजवले आहे. प्रशासन स्तरावरून यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंदिराची भव्यता दुरूनच दिसते. केदारनाथ पदयात्रा मार्गावर चालणाऱ्या १२ हजार घोडे आणि खेचरांची नोंदणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा केदारनाथची पंचमुखी उत्सव डोली गुरुवारी सकाळी ९ वाजता गौरीकुंड येथील गौरी माई मंदिरातून निघाली. ती जंगलचट्टी, लिंचोलीसह विविध थांब्यांवरून दुपारी ३ वाजता केदारनाथ धाम येथे पोहोचली. डोलीसह हजारो भाविकांनी धाम गाठली. यादरम्यान केदारनाथ मंदिर परिसरात डोली पोहोचताच भाविकांच्या जयघोषाने धाम दुमदुमली. शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजता बाबा केदारचे दरवाजे उघडले जातील. यावेळी बाबांचे धाम 12 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. मंदिराची भव्यता दुरूनच दिसते.
तयारी पूर्ण- यावेळी केदारनाथला मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे. केदारनाथसह संपूर्ण केदार घाटीमध्ये 20 जूनपर्यंत सर्व हॉटेल्स, लॉज बुक केले आहेत. यावेळी केदारनाथ पदयात्रा मार्गावर चालणाऱ्या १२ हजार घोडे आणि खेचरांची नोंदणी करण्यात आली आहे. उखीमठचे एसडीएम जितेंद्र वर्मा यांनी सांगितले की, प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रवासाला येणारे प्रवासी यावेळी ऑनलाइन नोंदणी करतील. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन यात्रा मार्गावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.