विनाशकारी केदारनाथ महाप्रलयाच्या आठवणी आजही कायम - Kedarnath Disaster
केदारनाथ महाप्रलयाच्या आठवणी अजूनही अंगावर शहारे उभे करतात. महापूरात ठार झालेल्यांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट नाही. आजही घाटीत सांगाडे सापडतात. केदारनाथ यात्रेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या हजारो लोक बेपत्ता झाले होते.
केदारनाथ
केदारनाथ महाप्रलयाला आठ वर्षे लोटली आहेत. परंतु त्या भयानक आठवणी अजूनही अंगावर शहारे उभे करतात. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीने भीषण रूप घेतले होते. दुर्घटनेत ठार झालेल्यांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट नाही. आजही केदार घाटीत सांगाडे सापडतात. केदारनाथ यात्रेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या हजारो लोक बेपत्ता झाले होते. आजही या संकटात बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक परिसरात त्यांचा शोध घेत असतात.