महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 1, 2022, 9:05 PM IST

ETV Bharat / bharat

Union Budget 2022 : अर्थसंकल्प निरुपयोगी आणि उद्देशहीन : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची टीका

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी TRS चे अध्यक्ष के चंद्रशेखर राव ( CM TRS president K Chandrashekhar Rao ) यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. केंद्र सरकारने सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने अनुसूचित जाती/जमाती आणि मागासवर्गीय तसेच शेतकरी आणि नोकरदार लोकांसह समाजातील विविध घटकांची निराशा केली आहे. राव यांनी अर्थसंकल्प निरुपयोगी आणि उद्देशहीन असल्याचे म्हटले आहे.

के चंद्रशेखर राव
के चंद्रशेखर राव

हैदराबाद: तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी टीआरएसचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव (CM TRS president K Chandrashekhar Rao) यांनी एक विधान जारी केले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प कोणतीही दिशा किंवा हेतू दर्शवत नाही. हा अर्थसंकल्प निरुपयोगी आणि अर्थहीन आहे. ते म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषण हे पोकळ आणि शब्दांची जुगलबंदी आहे.

सर्वसामान्यांना दुःख आणि नैराश्यात ढकलले

केसीआर यांनी आरोप केला की, एनडीए सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्वत:च्या स्तुतीचे पूल बांधले, तर प्रत्यक्षात सर्वसामान्यांना दुःख आणि नैराश्यात ढकलले. या अर्थसंकल्पाचे वर्णन ब्रेकअप बजेट असल्याचे सांगून त्यांनी त्यात तथ्य मांडण्यात आलेले नसल्याचा दावा केला. केसीआर म्हणाले की, कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्प एक मोठा शून्य आहे. कारण एनडीए सरकारने कृषी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत.

छोटे व्यापारी आणि नोकरदार लोकांची निराशा

हातमाग क्षेत्राला देण्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही, असेही ते म्हणाले. अर्थसंकल्पाने छोटे व्यापारी आणि नोकरदार लोकांची निराशा केली आहे, असा आरोप केसीआर यांनी केला आहे. पगारदार वर्ग आणि व्यापारी वर्ग या दोघांनाही त्यात बदलाची अपेक्षा असताना अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य आणि पायाभूत सुविधांकडे केंद्राचे दुर्लक्ष

सार्वजनिक आरोग्य आणि पायाभूत सुविधांकडे केंद्राचे दुर्लक्ष झाल्याचे अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसून आले आहे, असा दावा केसीआर यांनी केला. ते म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात जगभरात आरोग्य आणि पायाभूत सुविधा क्षेत्र विकसित केले जात आहेत. पण आपल्या केंद्र सरकारने त्या दिशेने विचारही केला नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

कोट्यवधी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी

दरम्यान, तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार म्हणाले की, अर्थसंकल्प क्रांतिकारी आहे आणि पुढील 25 वर्षांचे देशाचे भविष्य प्रतिबिंबित करतो. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर आव्हाने असतानाही करमुक्त अर्थसंकल्प सादर करणे हे धाडसी पाऊल असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणुकीच्या राजकारणाचा प्रभाव न पडता दीर्घकाळ लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे कुमार म्हणाले. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह इतर क्षेत्रांना 6 लाख कोटी रुपयांच्या प्रोत्साहनाने कोट्यवधी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील, असा दावा या भाजप नेत्याने केला.

ABOUT THE AUTHOR

...view details