नवी दिल्ली - केंद्राच्या धान खरेदी धोरणाला ( Paddy Procurement Policy ) विरोध करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी मोदी सरकारला राज्यातून धान खरेदी करणार असल्यास त्याचे उत्तर देण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. केंद्र सरकारने प्रतिसाद न दिल्यास देशभरात आंदोलन करण्याचाही इशारा केसीआर यांनी दिला आहे.
शेतकरी भिकारी नाही -तेलंगणा भवन येथे त्यांच्या टीआरएस पक्षाच्या नेत्यांसह धरणे धरत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला, आमच्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, त्यांच्यात सरकार पाडण्याची ताकद आहे. शेतकरी भिकारी नाहीत. त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मागण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. पुढे म्हणाले, हात जोडून मी मोदीजी आणि पीयूष गोयल यांना 24 तासांच्या आत धान खरेदीच्या राज्याच्या मागणीला प्रतिसाद देण्याची विनंती करतो.