महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Yasin Malik : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप; वाचा, काय आहे प्रकरण? - कोण आहे यासिन मलिक मराठी बातमी

जम्मू-कश्मीरमधील फुटिरवादी नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली ( Yasin Malik Delhi Court Award Life Sentence ) आहे.

Yasin Malik
Yasin Malik

By

Published : May 25, 2022, 7:50 PM IST

Updated : May 25, 2022, 8:06 PM IST

नवी दिल्ली - जम्मू-कश्मीरमधील फुटिरवादी नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) यासिनला फाशीच्या शिक्षेची मागणी केली ( Yasin Malik Delhi Court Award Life Sentence ) होती.

काय आहे प्रकरण? -यासिन मलिकने दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. १० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते. 19 मे रोजी न्यायालयाने यासिन मलिकला दोषी ठरवले. आज ( 25 मे ) दिल्लीतील पटियाला न्यायालयात यासिनला हजर करण्यात आले. त्यानंतर यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोणत्या कलमांर्तगत शिक्षा? - युएपीए कायद्यानुसार यासिन मलिकवर अनेक गुन्हे दाखल होते. त्यामध्ये कलम 16 ( दहशतवादी), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट), 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) तसेच, भारतीय दंड विधान कायद्यातील 120-ब (गुन्हेगारी कट) आणि 124-अ (देशद्रोह) या कलमांर्तगत यासिनला शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी बुरहान याच्या मृत्यूनंतर 2016-17 साली कश्मीरमध्ये आतंकवादी घटनांत वाढ झाली होती. त्यानंतर एनआयएने यासिक मलिक आणि त्याच्या अन्य साथिदारांना अटक केली.

कोण आहे यासिन मलिक -1966 साली यासिन मलिकचा जन्म झाला होता. जम्मू-कश्मीरमधील लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष यासिन मलिक होता. या संघटनेने 1989 सालानंतर कश्मीर खोऱ्यात कट्टरवादाचे नेतृत्व केले. यासिन मलिक जम्मू-कश्मीरला भारत पाकिस्तानपासून स्वतंत्र ठेवण्याचे समर्थन करायचा. 17 वर्षांचे असताना यासिन मलिक पहिल्यांदा जेलमध्ये गेला होता.

अजून कोणाकोणावर आरोप? - 16 मार्च रोजी न्यायालयाने हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन, यासिन मलिक, शब्बीर शाह आणि मसरत आलम, रशीद इंजिनियर, जहूर अहमद वताली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहम शाह, नईम खान, बशीर अहमद बट उर्फ ​​पीर सैफुल्ला आणि अन्य काही जणांवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते.

पाकिस्तानधून प्रतिक्रिया - यासिन मलिकला शिक्षा ठोठावण्यापूर्वी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ, माजी पंतप्रधान इमरान खान, शाहीद आफ्रिदी यांनी ट्विट करत मोदी सरकार आणि भारताविरोधात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शाहिद आफ्रिदी ट्विट करत म्हणाला की, 'भारत नेहमीप्रमाणे मानवधिकार उल्लंघनाविरुद्ध उठणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे प्रयत्न निरर्थक आहे. यासिन मलिकवर खोटे आरोप लावण्यात आले असून, त्याने कश्मीरचा स्वातंत्र संघर्ष थांबणार नाही. मी संयुक्त राष्ट्राला विनंती करतो की, त्यांनी कश्मिरी नेत्यांविरोधात सुरु असलेल्या या बेकायदा, अन्यायकारक गोष्टींची दखल घ्यावी,' असे ट्विट आफ्रिदीने केले आहे.

हेही वाचा -Afzal Khan Tomb Security : प्रतापगड पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ

Last Updated : May 25, 2022, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details