कोलकाता (पश्चिम बंगाल) : 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल, विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ममता बॅनर्जी यांच्या विधानाला विरोध करत त्यांनी मंगळवारी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सोमवारी केलेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी अन्यथा, त्यांनी केलेले विधान खरे असल्याचे सिद्ध करावे लागेल, असे या नोटिशीत म्हटले आहे.
कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला : काश्मीर फाइल्सचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'अनेक पत्रकार, राजकारणी काश्मीर फाइल्सला प्रोपगंडा म्हणत होते. परंतु, आता बस झाल. हे खपवून घेतले जाणार नाही. जे काश्मीरच्या फाइल्सला प्रोपगंडा म्हणत आहेत, त्यांनी चित्रपटातील कोणताही संवाद, दृश्य किंवा कोणतीही फ्रेम खोटी असल्याचे सिद्ध करावे. त्यामुळेच मी काश्मीर फाईल्सचे निर्माते विवेक अग्निहोत्री, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅनर्जी व्होट बँक खूश करण्यासाठी अशी विधाने करत असल्याचा दावा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्या चित्रपटांबद्दल म्हणतात की भाजप मला काश्मीर फाइल्स आणि आगामी चित्रपट बनवण्यासाठी निधी देते. मला वाटते की हे अपमानास्पद विधान आहे. या विधानाला कोणताही आधार नाही. ममता बॅनर्जी व्होट बँक खूश करण्यासाठी अशी विधाने करत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळेच आम्ही ममता बॅनर्जी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना नोटीस पाठवली आहे.
भविष्यासाठी धडा असावा : यापूर्वीही अशीच तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण मला वाटतं या प्रकरणात निर्माता आणि कलाकाराची ओळख दुखावली गेली आहे. चित्रपट निर्मात्यांविरोधात कोणीही अशा तक्रारी करू नये हा भविष्यासाठी धडा असावा अशी आमची इच्छा आहे. विशेष म्हणजे, बॅनर्जी यांनी नुकतेच सांगितले की, 'हे चित्रपट राजकीय हेतूने बनवले जात आहेत. असे चित्रपट बनवण्यामागे भाजपचा हात आहे त्यावरही त्यांनी आपले स्पष्टीकरण द्यावे असही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय 15 मेला करणार सुनावणी