महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kasaragod Jadadhari temple मागासवर्गीयांनी प्रवेश केल्याने चार वर्षांपासून चक्क मंदिरच ठेवले बंद

2018 मध्ये मागासवर्गीय तरुणांनी श्री जदाधारी ( Sri Jadadhari temple in Swarga  ) मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. कनिष्ठ जातींना मंदिरातून आशीर्वाद घेण्याची परवानगी नव्हती. अनेक वर्षांपासून दलितांना मंदिरात मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश ( Dalits restricted from temple ) बंदी आहे.

Kasaragod Jadadhari temple
चक्क मंदिरच ठेवले बंद

By

Published : Oct 27, 2022, 6:20 PM IST

कासारगोड : देशातून अस्पृश्यता नाहीशी झाली झाल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात आजही देशात जातिभेद होत असल्याचा पुरावा केरळमध्ये दिसत आहे. स्वर्गा येथील श्री जदाधारी मंदिर मागासवर्गीय तरुणांनी प्रवेश केल्यानंतर काही वर्षे बंद ( Kasaragod Jadadhari temple closed ) करण्यात आले.

2018 मध्ये मागासवर्गीय तरुणांनी श्री जदाधारी ( Sri Jadadhari temple in Swarga ) मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. कनिष्ठ जातींना मंदिरातून आशीर्वाद घेण्याची परवानगी नव्हती. अनेक वर्षांपासून दलितांना मंदिरात मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश ( Dalits restricted from temple ) बंदी आहे. ते पुढच्या पायऱ्यांच्या बाहेर प्रार्थना करू शकतात. पायऱ्यांनी प्रवेश करणे हे रीतिरिवाजांचे उल्लंघन मानले जाते. मागासवर्गीयांना मागच्या बाजूने जंगलाच्या वाटेने जावे लागते. त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ देखील पसरलेल्या कापडावर असतात. हे खाल्ल्यानंतर त्यांनी दूरवर प्रार्थना करावी आणि घरी परतावे लागते.

चार वर्षांपासून चक्क मंदिरच ठेवले बंद

मंदिर सहाशे वर्षांहून अधिक जुनेजातीभेदाच्या ( Jadadhari Kolam ) या सीमा तोडण्यासाठी कृष्ण मोहन यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्गीय तरुणांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी उच्च वर्गाच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. प्रथेचा भंग होऊन देवाचा कोप होईल असे म्हणत मंदिर बंद करण्यात आले होते. जडाधारी मंदिर एनमाकजे पंचायतीमध्ये आहे. मंदिर सहाशे वर्षांहून अधिक जुने होते. मंदिराच्या लाल रंगाच्या सिमेंट पायऱ्यांमधून फक्त उच्चवर्णीयच प्रवेश करू शकतात.

भेदभावामुळे मंदिर बंदजडाधारी थेय्यम आणि अन्नदानम (अन्न सर्व्हिंग) हे मंदिरातील मुख्य समारंभ आहेत. वर्षात तीन सण आणि मंगळवार, रविवार आणि आठवड्यातील इतर दिवशी विशेष पूजा देखील असतात. सध्या मंदिराचा परिसर झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. स्थानिक लोक ज्योतिषशास्त्राच्या मदतीने मंदिरातील प्रार्थना पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत. पण उच्च वर्ग सहकार्य करायला तयार नाही. आम्ही सर्वच बाबतीत आधुनिक आहोत, असे दावा करणाऱ्या लोकांनी भेदभावामुळे मंदिर बंद ठेवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details