बंगळुरू- कर्नाटक काँग्रेसवर लाजिरवाणी स्थिती ओढवली आहे. कर्नाटक काँग्रेसच्या पत्रकार परिषदेपूर्वी माजी खासदार व्ही. एस. उगराप्पा आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे समन्वयक सलीम यांनी टक्केवारीची कुजबुज केली. यामध्ये त्यांनी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याविषयी चर्चा केली. त्यामुळे भाजपने कर्नाटक काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
लोकसभेचे माजी खासादर उगराप्पा आणि सलीम अहमद हे व्हिडिओमध्ये डी. के. शिवकुमार यांच्याशी संबंधित टक्केवारीची कुजबुज करताना दिसत आहेत. व्यासपीठावर बसलेले उगराप्पा व्हिडिओमध्ये म्हणतात, पूर्वी 6 ते 8 टक्के होते. डी. के. शिवकुमार आले. त्यानंतर 12 टक्के झाले आहेत. यावरून कर्नाटक भाजपनेही निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाही. कर्नाटक भाजपने डी. के. शिवकुमार यांनी उद्देशून ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले, की कर्नाटक काँग्रेसमधील नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना चोर म्हटले आहे. तुम्ही चोर आहात का? तुम्ही 12 टक्के लाच घेता का? तुम्ही ही लूट पक्षाध्यक्षांना देता का? कृपया तुम्ही स्पष्टीकरण द्याल का?
हेही वाचा-महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह
काँग्रेसमध्ये टक्केवारी संस्कृती नाही-
कर्नाटक सरकारसाठी मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष हे कोट्यवधी रुपये गोळा करत असल्याचे त्यांचे नेते उघड करीत आहे. त्यांचे बॉस कशा पद्धतीने पैसे गोळा करत आहे, याचे त्यांनाही आश्चर्य आहे. याबाबत व्ही. एस. उगराप्पा यांनी खुलासा दिला आहे. त्यांनी म्हटले, की सलीम काय बोलत होते, हे स्पष्ट कळत नव्हते. त्यांना मी थांबविण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये टक्केवारीची संस्कृती नाही. भ्रष्टाचाराचे स्कँडल असल्याचे माध्यम चुकीचे सांगत आहेत, असा त्यांनी दावा केला.