महाराष्ट्र

maharashtra

Border Dispute : सीमावाद पेटण्याची शक्यता; कर्नाटकाने महाराष्ट्रातील गावांसाठी सोडले पाणी

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंधुरा ग्रामस्थांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला असून ते कर्नाटकात सामील होण्याच्या बाजूने आहेत. (Jath Taluka border dispute). महाराष्ट्र सरकारने आम्हाला मुलभूत सुविधा न दिल्यास आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एकत्र येऊन कर्नाटकात सहभागी होऊ, असे येथील गावकरी म्हणाले आहेत. (Maharashtra Karnataka Border Dispute).

By

Published : Dec 2, 2022, 9:30 PM IST

Published : Dec 2, 2022, 9:30 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

विजापूर (कर्नाटक) : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्रातील काही गावांना पाणी सोडत आहे. (Karnataka releases water for Maharashtra villages). पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील जत आणि सांगली तालुक्यातील २८ गावांना कर्नाटक पाणी सोडत आहे. सीमेवरील लोकांनी कर्नाटकच्या या पावलाचे कौतुक केले आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute).

महाराष्ट्रातील गावांसाठी सोडले पाणी

मानवतावादी दृष्टीकोनातून पाणी सोडले : यावर विजापूर येथे प्रतिक्रिया देताना आमदार एम.बी.पाटील म्हणाले, "कृष्णा नदीच्या तुबाची-बबलेश्वर उपसा सिंचन प्रकल्पातून गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राला पाणी सोडले जात आहे. तसेच यावर्षी देखील पाणी सोडण्यात आले आहे. आम्ही मानवतावादी दृष्टीकोनातून पाणी सोडत आहोत. गेल्या 40 वर्षांपासून महाराष्ट्र सरकार कर्नाटकला लागून असलेल्या महाराष्ट्रातील गावांकडे दुर्लक्ष करत आहे. महिषा योजना राबविण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, केवळ कर्नाटक सरकार मानवतावादी दृष्टिकोनातून त्या गावांना पाणी सोडत आहे. पुढील काळातही पाणी सोडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांना कर्नाटकात सामील व्हायचे आहे".

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंधुरा ग्रामस्थांनी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला असून ते कर्नाटकात सामील होण्याच्या बाजूने आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला मुलभूत सुविधा न दिल्यास आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एकत्र येऊन कर्नाटकात सहभागी होऊ, असे येथील गावकरी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details