महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पोलीस परीक्षेकरिता जिद्द: गर्भवती महिलेकडून 400 मीटर धावण्याचे अंतर 1.36 मिनिटांत पूर्ण - pregnant participated in PSI physical test

गर्भवती असलेल्या अश्विनीला बाळाची चिंता होती. त्यामुळे 400 मीटर धावण्याच्या फिजीकल टेस्टमधून सूट देण्याची तिने अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र, नियमाकडे बोट दाखवून अधिकाऱ्यांनी सूट देण्यास नकार दिला. त्यानंतर अश्विनीने हार मानली नाही.

पोलीस परीक्षेकरिता जिद्द
पोलीस परीक्षेकरिता जिद्द

By

Published : Aug 13, 2021, 8:12 PM IST

बंगळुरू- जिद्द असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला अडथळा आणू शकत नाही, हे कर्नाटकमधील महिलेने दाखवून दिले आहे. गर्भवती महिला ही स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने कलबुर्गी जिल्ह्यातील एसआयच्या फिजिकल टेस्टमध्ये सहभागी झाली. तिने 400 मीटरचे अंतर 1 मिनिट 36 सेकंदात पूर्ण करून फिजिकल टेस्ट उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली. अश्विनी संतोष कोरे (Ashwini Santhosh Kore) असे या 24 वर्षीय महिलेचे नाव आहे. ती 10 आठवड्यांची गर्भवती आहे.

माध्यमातील वृत्तानुसार बिदरमधील अभियंत्रा असलेल्या अश्विनी दोनवेळा फिजिकल टेस्ट उत्तीर्ण झाली आहे. मात्र, ती लिखित परीक्षा होऊ शकली नाही. गर्भवती असल्याने फिजिकल टेस्टमध्ये सहभागी होण्याबाबत अश्विनी संभ्रमात होती. धावण्यामुळे पोटातील बाळासाठी धोका होऊ शकतो, असे स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले होते.

हेही वाचा-मुलीसमोर वडीलांना बेदम मारहाण, वडीलांना सोडण्यासाठी चिमुकलीची याचना, VIDEO व्हायरल

400 मीटरचे अंतर पूर्ण

गर्भवती असलेल्या अश्विनीला बाळाची चिंता होती. त्यामुळे 400 मीटर धावण्याच्या फिजीकल टेस्टमधून सूट देण्याची तिने अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र, नियमाकडे बोट दाखवून अधिकाऱ्यांनी सूट देण्यास नकार दिला. त्यानंतर अश्विनीने हार मानली नाही. 400 मीटर अंतर धावण्याच्या टेस्टमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. 400 मीटरचे अंतर 1.36 मिनिटामध्ये पूर्ण केले. एवढेच नव्हे तर, लांब उडी आणि शॉटपुट अशा टेस्टही उत्तीर्ण केल्या आहेत.

हेही वाचा-Twitter v/s Congress : टि्वटर खाते लॉक झाल्यावर राहुल गांधी म्हणाले...

महिला गर्भवती असल्याची पोलिसांना नव्हती माहिती-

दरम्यान, ईशान्य क्षेत्राचे आयजीपी मनीष खरबीकर म्हणाले, की निवड समितीच्या सदस्यांना महिला गर्भवती असल्याचे माहित नव्हते. अनेक महिला उमेदवार गर्भावस्थेची माहिती निवड समितीच्या सदस्यांना माहिती देत नाही. कारण, फिजिकल टेस्टसाठी परवानगी मिळणार नाही, अशी त्यांना भीती असते.

हेही वाचा-स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर असताना दिल्ली पोलिसांची कारवाई; चार जणांकडून 55 पिस्तूल आणि 50 काडतूस जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details