महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka polls 2023 : निवडणुकीत भाजप रडीचा डाव खेळण्याची काँग्रेसला भीती; बुथ कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आदेश - काँग्रेसचे नेते प्रकाश राठोड

कर्नाटक विधानसभा निवडणुकीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणुकीत भाजप रडीचा डाव खेळण्याची भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या बुथ कार्यकर्त्यांना सावध केले आहे.

Karnataka polls 2023
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 10, 2023, 8:03 AM IST

Updated : May 10, 2023, 8:41 AM IST

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीवरुन काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप पक्षात चांगलाच वाद रंगला आहे. या निवडणुकीत विजयासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची भाजपची तयारी असल्याचा आरोप काँग्रेस नेते करत आहेत. भाजप रडीचा डाव खेळण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून काँग्रेसने आपल्या बुथवरील कार्यकर्त्यांना सावध राहण्याचे आदेश दिले आहेत.

मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करा :काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खूप सावध राहावे लागणार असल्याची माहिती राज्यातील काँग्रेसचे नेते प्रकाश राठोड यांनी दिली. भाजप पैशाचे राजकारण करेल, मतदार यादीत छेडछाड करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासह भाजप अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांची नावे हटवून बूथ ताब्यात घेण्याची शक्यता आसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रिटर्निंग अधिकारी भाजपला मदत करतील, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यापूर्वी पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुकीत हे आपण पाहिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपचे कार्यकर्ते मतदार यादीतून काही नावे हटवतात. ही खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आमच्या बूथ स्तरावरील नेत्यांनी मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, घरोघरी जाऊन मतदान होईल याची खात्री करावी, असेही प्रकाश राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पक्षाच्या वॉर रुमला तत्काळ द्या माहिती :कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ताधारी भाजपचा पराभव करण्याची आशा आहे. कर्नाटकची निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने मतदानाच्या दिवसाच्या तयारीचा आढावा मंगळवारी वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्यानुसार सर्व उमेदवारांना, राज्यातील नेत्यांना मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यावर बारीक लक्ष ठेवण्यास बजावण्यात आले आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास पक्षाच्या वॉर रुमला तत्काळ कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

काँग्रेस जिंकणार 113 पेक्षा जास्त जागा :कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेसला तब्बल 113 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत. काँग्रेसची समिती मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. काँग्रेसच्या दिग्गजांनी त्यांना बहुमताची आशा असून तब्बल 113 पेक्षा जास्त जागा काँग्रेस जिंकणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीची तयारी अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहितीही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

ऑपरेशन लोटसपासून घेतला धडा :कर्नाटक काँग्रेसने 2019 पासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. आम्ही ऑपरेशन लोटसमध्ये जेडी ( एस ) काँग्रेस आघाडीचे सरकार गमावले. त्यानंतर स्थानिक पातळीपासून जनसंपर्क कार्यक्रमांसाठी सगळ्यांना एकत्रित करण्यात आले. आम्ही कोणत्याही नेत्याला आराम करू दिला नाही. काँग्रेसचे राज्य प्रमुख डीके शिव कुमार आणि माजी मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांनी प्रजा ध्वनी यात्रेच्या माध्यमातून सर्व विधानसभा मतदारसंघ कव्हर केल्याची माहिती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एम वीरप्पा मोईली यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कंत्राटदार संघटनेचे एक पत्र त्यांनी ट्विट केले आहे. यात गेल्या काही वर्षांत सरकारी कंत्राटांवर 40 टक्के कमिशन आकारले जात असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी भाजपवर केला आहे.

हेही वाचा -

1) Cheetah Death in Kuno: कुनो नॅशनल पार्कमध्‍ये तिसरा चित्ता मरण पावला, मिलनाच्‍या वेळी चित्‍यांमध्ये झाली झटपट

2) Shraddha Walker murder case: आरोप सिद्ध झाल्यास आफताब पूनावालाला होणार फाशी?

3) Guddu Muslim CCTV Footage : गुड्डू मुस्लिमचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Last Updated : May 10, 2023, 8:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details