बंगळुरू - पंतप्रधानांचा नुकताच कर्नाटक दौरा झाला. या दौऱ्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 23 कोटी रुपये खर्चून बेंगळुरू येथील रस्त्याचे तत्काळ काम करून घेतले. दरम्यान, हे काम निकृष्ट दौऱ्याचे झाले आहेत अशी नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, आता या घटनेच्या पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागवला आहे. सुमारे 23 कोटी रुपये खर्च करून हे रस्ते बनवले आहेत.
पंतप्रधानांचा दौरा असल्याने रस्ते लगेच दुरुस्त होऊ शकतात. मात्र, सामान्य लोक कित्येक दिवसांपासून याच रस्त्यावरून प्रवास करत आहेत. त्यांच्यासाठी इतक्या लवकर का नाही रस्ते दुरुस्त होत असा प्रश्न आता कर्नाटकमधील नागरिक बौम्मई सरकारला विचारत आहेत.
23 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा भाग असलेल्या ज्ञानभारती मुख्य रस्त्याची 6 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली आणि सोमवारी पंतप्रधान मोदींनी या मार्गावर प्रवास केला. रात्रभर पडलेल्या पावसानंतर, रस्ता खचला. बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ यांनी सांगितले की, काही ठिकाणी डांबरी रस्ता केवळ मुसळधार पावसामुळे खराब झाला होता आणि "दुरुस्त रस्त्याचा संपूर्ण भाग आहे असे म्हणणे योग्य नाही.