नवी दिल्ली- सिद्धरामैय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत केली. या सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद शिवकुमार यांच्याकडेच असणार आहे. उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचा २० मे रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.
केपीसीसीचे अध्यक्षपद शिवकुमार यांच्याकडे राहणार : कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आणि एआयसीसी सचिव केसी वेणुगोपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. डीके शिवकुमार हे संसदीय निवडणुका संपेपर्यंत कर्नाटकच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 मे रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्यासाठी समविचारी पक्षांच्या लोकांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमची एकजूट आहे-शिवकुमारकर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांची निवड झाल्याची घोषणा झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांचे मन वळवण्यात काँग्रेस हायकमांडला अखेर यश आले आहे. काँग्रेस हायकमांडने काही अटींवर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत कलह मिटविला आहे.