महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गाझियाबाद मारहाण प्रकरण: ट्विटरच्या एमडीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा - Karnataka High Court

गाझियाबाद पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना जातीय अशांतता पसरवल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठविली होती. एका आठवड्याच्या आत निवेदन नोंदवण्यासाठी त्यांना लोणी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.

Manish Maheshwari
मनीष माहेश्वरी

By

Published : Jun 24, 2021, 6:04 PM IST

बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी (Twitter Managing Director Manish Maheshwari) यांना अंतरिम दिलासा दिला आहे. माहेश्वरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने गाझियाबाद पोलिसांना कठोर पावले न उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

माहेश्वरी यांनी गाझियाबाद पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लोणीमधील मारहाणी प्रकरणात माहेश्वरी यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले, की कंपनीचे एमडी हे कर्मचारी आहेत. त्यांचा गुन्ह्याशी काही संबंध नाही. त्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांना अंतिरम दिलासा दिला आहे. जर गाझियाबाद पोलिसांना ट्विटरच्या व्यवस्थापकीय संचालकांची चौकशी करायची असेल तर ते ऑनलाईन पद्धतीनेही चौकशी करू शकतात, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

हेही वाचा-मुंबईत पेट्रोल आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!

गाझियाबाद पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना जातीय अशांतता पसरवल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठविली होती. एका आठवड्याच्या आत निवेदन नोंदवण्यासाठी त्यांना लोणी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. ट्विटर इंडियाविरोधात लोणी पोलीस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-सोनिया गांधींनी बोलावली AICC ची बैठक; कोरोना आणि इंधन दरवाढीवर चर्चा

काय म्हटले होते नोटीसीमध्ये?

इंडियाचे एमडी म्हणून तुम्ही कंपनीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे भारतीय कायदा तुम्हाला बंधनकारक असल्याने तपासात सहकार्य करण्याची गरज आहे. भारतातील स्थितीप्रमाणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ट्विट काढून टाकण्याचे अधिकार आहेत. द्वेष पसरविल्या जाणाऱ्या ट्विटमुळे समाजात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचेही पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच देशातील दोन गटांमध्ये शत्रुत्वाची भावना आणि सामाजिक एकतेला धोका निर्माण झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.

हेही वाचा-कोरोना कमी होतोय! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54 हजार रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 96.61 वर

काय प्रकरण?

गाझीयाबादमधील व्हायरल व्हिडिओत काही तरुण वृद्ध मुस्लिम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देण्याची बळजबरी हल्लेखोरांनी आपल्यावर केली. मोबाइल काढून घेतला आणि चाकूने आपली दाढी कापली, असे पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी हे बुलंदशहरातील रहिवासी आहेत. गेल्या 5 जूनला ते लोनी बॉर्डरच्या बेहटा येथे पोहचले. अब्दुल समद तेथून एका अन्य व्यक्तिसोबत आरोपी प्रवेश गुज्जरच्या घर बंथला गेले होते. पीडित अब्दुल समद ताबीज बनवण्याचे काम करतात. ताबिजचा प्रभाव उलटा झाल्यानंतर आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पीडित व्यक्तीने आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केल्याचा आरोप केला. तर हा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून न रोखल्याप्रकरणी ट्विटरवर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details