बंगळुरू : पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे क्रुरतेच्या श्रेणीत येते, परंतु तो गुन्हा नसल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. पती आणि सासरच्यांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करणाऱ्या पत्नीच्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीने पतीविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. परंतु न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हिंदू विवाह कायदा-1955 नुसार पतीने शारीरिक संबंध नाकारणे हे क्रूरतेच्या श्रेणीत येते, परंतु आयपीसीचे कलम 489A च्या अंतर्गत गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेली फौजदारी कारवाई न्यायालयाने रद्द केली.
प्रेम केवळ शारीरिक संबंध नाही :पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांच्या खंडपीठाने विचार केला. याचिकाकर्त्या विवाहितेच्या पतीने त्याच्या आणि त्याच्या पालकांविरुद्ध आयपीसी कलम 498A आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 अंतर्गत पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान दिले. प्रेम हे केवळ शारीरिक संबंध नसून ते आत्म्याचे आणि आत्म्याचे मिलन असले पाहिजे असा याचिकाकर्त्याच्या पतीचा विश्वास आहे.