बंगळुरू - कर्नाटक राज्य सरकार लग्नासाठी धर्मांतरणावर बंदी घालण्यासाठी लवकरच कायदा करेल, असे राज्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी म्हटले आहे. यासाठी रवी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भही दिला आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे कन्नड आणि संस्कृती मंत्री सी. टी. रवी यांनी ट्विटरवर याबाबत सांगितले. 'जेव्हा जिहादी आमच्या बहिणींच्या सन्मानाला धक्का पोहोचवतील, तेव्हा आम्ही गप्प बसणार नाही. धर्मांतरणाच्या कृतीत गुंतलेल्या प्रत्येकाला गंभीर आणि कठोर कारवाईचा सामना करावा लागेल.'
हेही वाचा -हॅकर्सनी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला 100 हाय-प्रोफाइल लोकांवर हल्ला - मायक्रोसॉफ्ट