महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आता सरकारी कार्यालयांमध्ये फोटो, व्हिडीओ घेण्यास 'या' राज्याने घातली बंदी - कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटना

सरकारी कार्यालयांमध्ये जात फोटो आणि व्हिडीओ काढून त्याचा दुरुपयोग करण्याच्या वाढत्या प्रकारणांनंतर आता कर्नाटक सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये फोटो आणि व्हिडीओ घेण्यासाठी परवानगी बंधनकारक केली आहे. परवानगीशिवाय फोटो, व्हिडीओ घेण्यास बंदी घालण्यात आली ( Photo Video Banned Karnataka Govt Office ) आहे. ( karnataka State Govt Employees Union )

Karnataka government bars photos, videos in govt offices
आता सरकारी कार्यालयांमध्ये फोटो, व्हिडीओ घेण्यास 'या' राज्याने घातली बंदी

By

Published : Jul 15, 2022, 9:15 PM IST

बेंगळुरू ( कर्नाटक ) : कर्नाटक सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये फोटोग्राफी किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालणारा आदेश जारी केला ( Photo Video Banned Karnataka Govt Office ) आहे. कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या ( karnataka State Govt Employees Union ) विनंतीनंतर कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने शुक्रवारी एक आदेश जारी केला.

परवानगी आवश्यक :या आदेशात म्हटले आहे की, राज्य जनतेने कार्यालयात असताना आणि कर्तव्ये पार पाडताना सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू नयेत. या आदेशामुळे अनेक चुकीच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोशल मीडियावर होतात अपलोड :सरकारी कार्यालयांमध्ये व्हिडिओ शूट करणाऱ्या काही लोकांकडून सरकारी कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केला होता. काही लोकांनी कार्यालयात येऊन परवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. ते फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर करतात, असे संघटनेचे म्हणणे होते.

हेही वाचा :वाणीच्या आकर्षक फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ - पाहा फोटो

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details