महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Crime News : कर्नाटकचा 'लखोबा लोखंडे', डॉक्टर असल्याचे भासवून तब्बल 15 मुलींशी केले लग्न - डॉक्टर असल्याचे भासवून महिलांची फसवणूक

कर्नाटकातील एका व्यक्तीने फसवणूक करून 15 महिलांशी लग्न केले. ही व्यक्ती स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत असे. परंतु त्याची इंग्रजी खराब असल्यामुळे तो पकडला गेला.

Karnataka Crime News
कर्नाटकातील पुरुषाने १५ महिलांशी लग्न केले

By

Published : Jul 11, 2023, 5:06 PM IST

म्हैसूर (कर्नाटक) : कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे डॉक्टर असल्याचे सांगून तब्बल 15 महिलांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनियरला संशय आल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले. याबाबत तिने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

15 पेक्षा अधिक महिलांना फसवून लग्न केले : महेश के. बी. नायक असे आरोपीचे नाव आहे. तो बेंगळुरूच्या बनशंकरी भागातील रहिवासी आहे. हा 35 वर्षीय आरोपी आधी महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न करायचा आणि लग्नानंतर त्यांचे पैसे आणि दागिने घेऊन पळून जायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 2014 पासून 15 पेक्षा अधिक महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न केले आहे.

खराब इंग्रजीमुळे फसला : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने गेल्यावर्षी एका सॉफ्टवेअर इंजिनियरला आपल्या जाळ्यात अडकवले होते. मात्र आरोपीच्या खराब इंग्रजीमुळे तिला संशय आला. त्यानंतर तिने त्याच्याबद्दल माहिती गोळा केली आणि त्याच्याविरुद्ध म्हैसूर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांना यापूर्वी देखील एका महिलेची तक्रार प्राप्त झाली होती.

आरोपीला चार मुले आहेत : पोलिसांनी सांगितले की, आरोपीने बनावट वैवाहिक प्रोफाइल तयार करून निष्पाप महिलांना आपल्या जाळ्यात अडकवले. आरोपी स्वत:ला कधी इंजिनियर तर कधी डॉक्टर म्हणवून घेत असे. त्‍याने तुमाकुरू शहरात बनावट क्‍लिनिक सुरू केले आणि तेथे नर्सची नेमणूक केली होती. त्याचे इंग्रजी खराब असल्याने अनेक महिलांनी त्याला नकार दिल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. तपासादरम्यान, आरोपीला चार मुले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा :

  1. BJP MLA Fake Message To Women: भाजप आमदाराच्या नावाने महिलांना हाय, हॅलो, भेटू शकता का? मॅसेज पाठविले, आरोपी अटक
  2. Mumbai Crime: मसाजच्या नावावर हॉटेलमध्ये बोलावले अन् बंदुकीच्या धाकावर लुटले; वाचा धक्कादायक घटना
  3. Mumbai Crime: चेष्टेत अनोळखी क्रमांकावरून मित्राला केला 'हा' व्हॉट्सअप मेसेज, पोलिसांनी थेट तुरुंगात केली रवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details