बंगळुरू - संतोष पाटील कंत्राटदार ( Contractor Santosh Patil suicide ) आत्महत्या प्रकरणी ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस ईश्वरप्पा यांनी अखेर राजीनामा ( Minister Eshwarappa resigns congress protest ) देण्याची घोषणा केली आहे. विरोधकांनी मंत्री ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मंत्र्याच्या अटकेच्या मागणीसाठी कर्नाटक काँग्रेसने दिवसभर आंदोलन सुरूच ठेवले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानाकडे कूच करत असताना अनेक नेत्यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले.
एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला ( Randeep Singh Surjewala ) , विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार ( Congress president DK Shivkumar ) आणि इतर प्रमुख नेत्यांना रेसकोर्स रोडजवळ ताब्यात घेण्यात ( congress leaders detained in Karnataka ) आले. त्यांना काहावेळानंतर सोडण्यात आले. बेळगावचे कंत्राटदार संतोष के. पाटील यांनी उडुपी येथील एका लॉजमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी मोबाईल मेसेजद्वारे थेट मंत्री ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे सांगितले होते. आपल्या गावाजवळ 4 कोटी रुपये खर्चून केलेल्या कामांसाठी 40 टक्के कमिशन देण्यासाठी ईश्वरप्पा यांनी दबाव आणल्याचे त्यांनी मोबाईल मेसेजमध्ये म्हटले होते.
ईश्वरप्पा म्हणतात हे विरोधकांचे षडयंत्र- कर्नाटक पोलिसांनी मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यावर मंत्री म्हणाले की, माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. आदल्या दिवशी, सीएम बोम्मई यांनी सांगितले होते की पोलिसांकडून प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर निर्णय घेऊ, असे म्हटले होते.
राजकीय संघर्ष नसून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा-या प्रकरणाबाबत सुरजेवाला यांनी सीएम बोम्मई यांच्यावर घटनेच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला. सुरजेवाला म्हणाले, कर्नाटकला भ्रष्टाचारमुक्त राज्य बनवण्यासाठी काँग्रेसने निषेध मोर्चा काढला आहे. त्याअंतर्गत सीएम बोम्मई यांच्या निवासस्थानाला घेराव घालून आंदोलन सुरू केले जाईल. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकावा लागेल. हा राजकीय संघर्ष नसून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा आहे. कंत्राटदाराच्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा थेट जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला. काँग्रेसच्या अनेक सर्व नेत्यांनी कंत्राटदार संतोष पाटील यांच्या घरी जाऊन शोक व्यक्त केला.