म्हैसूर -कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरमैय्या ( Siddaramaiah Visit Sidharameswar Yatra ) यांनी गुरुवारी त्यांच्या मूळ गावी सिद्धरामनहुंडी सिद्धरामेश्वराच्या जत्रेला भेट दिली. यावेळी त्यांनी जवळजवळ 40 मिनीटं ( Siddaramaiah danced in Jatra ) नृत्यही केले. यावेळी सिद्धरमैय्या यांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी ( Crowd To Watch Siddaramaiah Dance ) जमा झाले होते. तसेच यावेळी सिद्धरमैय्या यांनी त्यांच्या जन्मस्थानी कुलदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराची पुजाही केली. यावेळी सिद्धरमैय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला.
Siddaramaiah Dance : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्यांनी जत्रेत केले नृत्य, पाहा VIDEO - सिद्धरमैय्या नृत्य व्हिडीओ
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरमैय्या ( Siddaramaiah Visit Sidharameswar Yatra ) यांनी गुरुवारी त्यांच्या मूळ गावी सिद्धरामनहुंडी सिद्धरामेश्वराच्या जत्रेला भेट दिली. यावेळी त्यांनी जवळजवळ 40 मिनीटं ( Siddaramaiah danced in Jatra ) नृत्यही केले. यावेळी सिद्धरमैय्या यांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी ( Crowd To Watch Siddaramaiah Dance ) जमा झाले होते.
Siddaramaiah danced in Jatra
'येथे आल्याचा मला आनंद' -मी आमच्या मूळ गावाची जत्रा कधीच चुकवत नाही. मी यापूर्वी मंत्री असतानाही येथे आलो होतो. तसेच मुख्यमंत्री असतानाही मी इथे आलो होतो. यापूर्वी दर दोन वर्षांनी ही जत्रा भरायची. मात्र, आता तीन वर्षांनी भरते, अशी प्रतिक्रिया सिद्धरमैय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कोवि़डमुळे आम्ही गेल्या वर्षी ही यात्रा आयोजित केली नव्हती. मात्र, आता येथे येऊन मला आनंद होत आहे. असेही ते म्हणाले.