महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DK Shivakumar: कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरला गरुडाची धडक, दोघजण जखमी - डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरला गरुडाची धडक

होस्कोटेजवळ कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरला गरुडाची धडक बसली. या अपघातात डीके शिवकुमार यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

Karnataka Congress Chief
Karnataka Congress Chief

By

Published : May 2, 2023, 7:29 PM IST

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यासोबत एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. होस्कोटेजवळ डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरला गरुडाची मोठी जोरदार धडक बसली. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरच्या पुढील काचा फुटल्या. पायलटच्या प्रसंगावधानामुळे हेलिकॉप्टर बेंगळुरू येथील एचएएल हेलिपॅडवर सुरक्षितपणे उतरले. या अपघातात डीके शिवकुमार यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेदरम्यान त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेल्या अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. डीके शिवकुमार एका निवडणूक रॅलीसाठी मुलाबागिलू येथे जात असताना ही घटना घडली.

त्याच हेलिकॉप्टरचे तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले : मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बेंगळुरूमधील एका खासगी हॉटेलमध्ये पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर शिवकुमार हेलिकॉप्टरने कोलारच्या मुलबागिली येथे निवडणूक प्रचारासाठी जात होते. त्यानंतर, उड्डाणाच्या दरम्यान, होस्कोटेजवळ एक गरुड त्यांच्या हेलिकॉप्टरला धडकले. पक्ष्याच्या धडकेने हेलिकॉप्टरच्या विंडशील्डचा चक्काचूर झाला. अपघातामुळे डीके शिवकुमार ज्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. त्याच हेलिकॉप्टरचे तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण यावेळी उपस्थित होते.

इमर्जन्सी लँडिंगमध्ये त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल मी वैमानिकाचे आभार : एक पत्रकार आपल्या कॅमेरामनसोबत हेलिकॉप्टरमध्ये एका खासगी वाहिनीसाठी डीके शिवकुमार यांची मुलाखत घेत होता. त्याचवेळी त्यांच्यासोबत राजकीय सल्लागार अमित पल्याही उपस्थित होते. या अपघातात कॅमेरामन आणि अमित पल्या यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरचा प्रवास रद्द करत डीके शिवकुमार रस्त्याने प्रचारासाठी रवाना झाले. या घटनेत कोणताही धोका नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवकुमार यांनी ट्विट करून आपल्यासोबत झालेल्या अपघाताची माहिती दिली. आपल्या सुरक्षेबाबतही माहिती दिली. त्यांनी ट्विट केले की, 'मुलबागलला जाताना आमचे हेलिकॉप्टरला किरकोळ अपघात झाला. त्यामध्ये माझे सहकारी प्रवासी जखमी झाले. मी सुरक्षित आहे, आणि इमर्जन्सी लँडिंगमध्ये त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल मी वैमानिकाचे आभार मानतो असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : Intelligence Report On Moist : नक्षलवाद्यांनी विचारधारा टिकवण्यासाठी घेतली विविध संघटनांची मदत, गुप्तचर विभागाच्या अहवालात खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details