महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra Karnataka Border Dispute : आम्ही अक्कलकोट, सोलापूर दिले अन् बेळगाव घेतले : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे - महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद

१९५६ साली आम्ही अक्कलकोट आणि सोलापूर महाराष्ट्राला देत बेळगाव आम्हाला घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद ( Maharashtra Karnataka Border Dispute ) आमच्यासाठी यापूर्वीच संपलेला आहे, अशी मुक्ताफळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka CM Basavraj bommai ) यांनी उधळली आहेत.

बसवराज बोम्मई
बसवराज बोम्मई

By

Published : Mar 23, 2022, 10:50 PM IST

बंगळुरू: १९५६ साली आम्ही अक्कलकोट आणि सोलापूर महाराष्ट्राला देत बेळगाव आम्हाला घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद ( Maharashtra Karnataka Border Dispute ) आमच्यासाठी यापूर्वीच संपलेला आहे, अशी मुक्ताफळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उधळली ( Karnataka CM Basavraj bommai ) आहेत. बोम्मई यांच्या या विधानाने आता पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काश्मीर फाईल्स चित्रपटाप्रमाणे बेळगाव फाईल्स चित्रपट आला पाहिजे असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut Tweet Belgaum Files ) यांनी केलं होत. त्यावर प्रत्त्युत्तर देताना बोम्मई बोलत होते. ते म्हणाले की, संजय राऊत यांचा हा एक स्टंट होता.

पण आता बोलण्यात अर्थ नाही :1956 मध्ये बेळगावच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला. आमचे कन्नड भाषिक महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट येथे राहतात. मात्र, अशा प्रकारे बोलण्यात आता अर्थ नाही. बेळगावचे नाव घेऊन तिथल्या ( महाराष्ट्र ) समस्या वळवण्यासाठी राऊत असे बोलत असल्याचे ते म्हणाले. बेळगावात लोकशाहीची हत्या होत आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. त्यावर आता बेळगाव फाईल्स चित्रपट आला पाहिजे असं राऊत म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details