महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 5, 2022, 1:13 PM IST

Updated : Dec 5, 2022, 3:54 PM IST

ETV Bharat / bharat

Karnataka CM Basavaraj Bommai :बेळगावात येण्याचे धाडस केल्यास कायदेशीर कारवाई करू - बसवराज बोम्मई

आम्ही त्यांना आधीच कळवले आहे की यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा ( Maharashtra Karnataka border row ) प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे ही योग्य वेळ नाही. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की हे प्रकरण न्यायालयात आहे आणि ते कायदेशीररित्या लढा.

Karnataka CM Basavaraj  Bommai
बसवराज बोम्मई

बंगळुरू :कर्नाटकातील बेळगावमध्ये सीमावाद वाढला आहे.महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे आमच्या मुख्य सचिवांमार्फत महाराष्ट्राच्या सचिवांना यापूर्वीच लेखी कळवण्यात आले आहे. मात्र, बेळगावात येण्याचे धाडस केल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा सीएम बसवराज बोम्मई ( Karnataka CM Basavaraj Bommai ) यांनी दिला आहे.

हे प्रकरण न्यायालयात - आम्ही महाराष्ट्र सरकारला आधीच कळवले आहे की, महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्याने येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे ही योग्य वेळ नाही. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की हे प्रकरण न्यायालयात आहे आणि ते कायदेशीररित्या लढा, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री दिली आहे.

हुबळीच्या विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मंत्री बेळगावी आल्यास सध्याची परिस्थिती बदलेल. येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यांचे येणे योग्य नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकांमध्ये एकोपा आहे. त्याचवेळी, सीमा विवाददेखील आहे. कर्नाटकच्या मते सीमा वाद हा एक संपलेला अध्याय आहे. मात्र महाराष्ट्र वारंवार सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी राज्यात येण्याचे धाडस केले तर अधिकारी कारवाई करतील. मी यापूर्वीच अधिकाऱ्यांना कळवले आहे, असे ते म्हणाले. आंदोलन विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी जेव्हा जेव्हा असे प्रकार घडले तेव्हा सरकारने जी पावले उचलली आहेत ती आम्ही उचलू.

सीमावाद पेटला - कर्नाटकातील बेळगावमध्ये सीमावाद वाढला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी मंगळवारी सीमावर्ती शहराला भेट देण्याची घोषणा केली. दुसरीकडे कन्नड संघटनांनी कामगारांना बेळगावी येऊन राज्यात प्रवेश रोखण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटक रक्षण वेदिके यांनी या संदर्भात बैठक घेतली आणि सोमवारी संध्याकाळी बेंगळुरूहून कन्नड कामगार 100 वाहनांतून बेलगावीला रवाना होतील, अशी घोषणा केली. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यातील कन्नड कामगार इच्छित स्थळी पोहोचणार आहेत.

कायदेशीर लढा - आम्ही त्यांना आधीच कळवले आहे की यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा ( Maharashtra Karnataka border row ) प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे ही योग्य वेळ नाही. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की हे प्रकरण न्यायालयात आहे आणि ते कायदेशीररित्या लढा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा ( Karnataka CM on the visit of Maharashtra ministers ) दौरा रद्द होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Last Updated : Dec 5, 2022, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details