महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 2, 2023, 5:07 PM IST

Updated : Jun 2, 2023, 5:22 PM IST

ETV Bharat / bharat

Karnataka implement five guarantees : कर्नाटकात 15 ऑगस्टपासून 200 युनिट मोफत वीज, सर्व ५ आश्वासनांची पूर्तता - सिद्धरामय्या

कर्नाटक सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पहिल्या कॅबिनेट मीटिंगपासूनच पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून सर्वांसाठी 200 युनिट मोफत वीज मिळणार आहे. तसेच गृह लक्ष्मी योजना, महिलांसाठी 11 जूनपासून बस मोफत योजना तसेच इतर योजनाही सुरू करण्याची घोषणा पहिल्याच कॅबिनेट बैठकीनंतर केली आहे.

सिद्धरामय्या
सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक): कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांची अंमलबजावणी चालू आर्थिक वर्षात केली जाईल.

आम्ही आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आम्ही पाचही आश्वासनांवर सखोल चर्चा केली. आम्ही ठरवले आहे की सर्व पाच हमी चालू आर्थिक वर्षात लागू केल्या जातील - सिद्धरामय्या, मुख्यमंत्री कर्नाटक

पाच 'मुख्य' हमी, ज्या काँग्रेसने कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामध्ये सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज (गृह ज्योती); प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला 2,000 रुपये मासिक मदत (गृह लक्ष्मी); बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ मोफत (अण्णा भाग्य); बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी दरमहा रु 3,000 आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांसाठी रु. 1,500 (दोघेही 18-25 वयोगटातील) दोन वर्षांसाठी (युवनिधी) आणि महिलांसाठी सार्वजनिक परिवहन बस (शक्ती) मध्ये मोफत प्रवास, याचा समावेश होता.

'गृह ज्योती': सिद्धरामय्या म्हणाले की 1 जुलैपासून (सुमारे 200 युनिट मोफत विजेची हमी देण्याची) अंमलबजावणी सुरू होईल. एकूण 200 युनिट वीज मोफत असेल. ज्या ग्राहकांनी जुलैपर्यंत बिल भरले नाही त्यांना पैसे भरावे लागतील असे ते म्हणाले.

'गृह लक्ष्मी': आम्ही गृह लक्ष्मी योजना लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते असावे. या योजनेसाठी अर्ज करावा. त्यानुसार 15 जून ते 15 जुलै दरम्यान अर्ज सादर करावा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली आहे की महिलांनी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ही योजना 15 ऑगस्टपासून लागू केली जाईल. सासू किंवा सून असा काही भेदभाव न करता योजना राबवण्यात येणार आहेत. 18 वर्षे पूर्ण केलेल्या महिला ज्या या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांना त्याचा लाभ देण्यात येईल. काही तांत्रिक अडचण असल्याने हा प्रकल्प तातडीने राबविला जाणार नाही. सर्व पडताळणीसाठी वेळ लागत असल्याने, आम्ही अर्ज मागवून घेऊन त्याची पडताळणी करू. त्यानंतर आम्ही 15 ऑगस्टपासून योजना लागू करू आणि सर्वांना 2000 हजार रुपये देऊ. यासाठी कोणतीही अट नाही,' असे मुख्यमंत्री म्हणाले.

ही योजना APL आणि BPL कार्डधारकांनाही लागू होईल. कोणत्याही अतिरिक्त अटी नाहीत. अर्ज ऑनलाइन भरता येतो. सॉफ्टवेअरही विकसित करणे आवश्यक असल्याने हा प्रकल्प तातडीने राबविला जाणार नाही. वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळवणाऱ्यांनाही ही योजना लागू होणार आहे. अपंग आणि वृद्धांनाही ती दिली जाईल. तसेच गृहलक्ष्मी योजनेंतर्गत 2000 रुपये दिले जातील - सिद्धरामय्या

'अन्नभाग्य योजना': आम्ही निवडणुकीत 10 किलो धान्य देण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही १ जुलैपासून सर्व बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना दिलेले वचन पूर्ण करू. आम्ही १ जुलैपासून ही योजना लागू करू, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच शक्ती योजने अंतर्गत आम्ही सर्व महिलांना परिवहन बसमध्ये मोफत प्रवास देण्याचे वचन पूर्ण करू. या महिन्याच्या 11 तारखेपासून ही योजना महिला विद्यार्थिनींसह लागू करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम फक्त कर्नाटक राज्यात मर्यादित आहे. महिला बेंगळुरू ते कोलार, बिदर, बेळगावी इत्यादी राज्यात कुठेही प्रवास करू शकतात असे, मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एसी व्यतिरिक्त, तुम्ही एक्स्प्रेस बसमधून प्रवास करू शकता. मात्र या योजनेबाबत बेंगळुरूहून तिरुपती आणि हैदराबादला जाणे शक्य नाही, ही सेवा फक्त राज्याच्या सीमांच्यापर्यंत उपलब्ध असेल. AC आणि लक्झरी बसेस वगळता इतर 94% बसमध्ये महिला कोणत्याही अटीशिवाय आणि कोणत्याही बस शुल्काशिवाय कुठेही प्रवास करू शकतात. ही योजना बेंगळुरूमध्ये 11 जूनपासून लागू होणार आहे. बीएमटीसीच्या बसमध्ये आरक्षण नाही, असेही ते म्हणाले.

युवानिधी योजना : आम्ही 2023 मध्ये बीए, बीएससी उत्तीर्ण झालेल्या सर्व पदवीधरांना 24 महिन्यांसाठी दरमहा 3000 रुपये देऊ. डिप्लोमा धारकांना 1500 रुपये दिले जातील. त्यांना 24 महिन्यांत खासगी किंवा सरकारी नोकरी मिळाली तर ही योजना बंद केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ही योजना सर्व बेरोजगारांसाठी आणि ज्यांनी जात, धर्म किंवा लिंग न पाहता अर्ज केला आहे त्यांच्यासाठी लागू केली जाईल. ही योजना तृतीयपंथियांसाठीही लागू असेल. आम्ही आमच्या मंत्रिमंडळात काँग्रेसने दिलेल्या पाचही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 180 दिवस आहेत, ज्यांना नोकरी मिळत नाही ते अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ घेऊ शकतात. बेरोजगार युवकांना 2 वर्षांसाठी वेतन दिले जाईल. यापूर्वी आम्ही 165 आश्वासने दिली आणि 155 आश्वासने पूर्ण केली. आम्ही आमची आश्वासने पूर्ण करू आणि आता आम्ही आमची आश्वासने देखील पूर्ण करत आहोत - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल : भाजप आणि नरेंद्र मोदींनी त्यांची सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत का, असा सवालही यावेळी सिद्धरामय्या यानी केला. तसेच त्याबाबत विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले की, आम्हाला प्रश्न करण्याचा भाजपला अधिकार नाही. त्यांनी आधी त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करावी. मगच काँग्रेसवर टीका करावी असे सिद्धरामय्या म्हणाले.

Last Updated : Jun 2, 2023, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details