बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामा जाही केला आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून काँग्रेसने मतदारांना निवडणुकीत अनेक आश्वासने दिली आहेत. यावेळी खर्गे यांनी काँग्रेस पक्ष कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू केली जाईल, असेही खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन :कर्नाटक राज्यात सरकार स्थापन झाल्यास सर्व रिक्त शासकीय पदे भरण्याचे आश्वासन मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले. 2006 नंतर नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजनेंतर्गत (OPS) पेन्शन दिली जाईल असेही त्यांनी यावळी स्पष्ट केले. जाहीरनामा जारी करताना रणदीप सिंह सुरजेवाला, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या, बीके हरिप्रसाद आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष जी परमेश्वर शांग्रीला उपस्थित होते.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
- पुढील 5 वर्षात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ₹ 1.5 लाख.
- पीक नुकसान भरपाईसाठी रु. 5000 कोटी (रु. 1000 कोटी दरवर्षी).
- अन्नभाग्य योजनेत 10 किलो तांदळाची हमी.
- दुधावरील अनुदान 5 रुपयांवरून 7 रुपये करण्यात येणार आहे.
- महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत बस प्रवास योजना.
- नारळ उत्पादक शेतकरी आणि इतरांसाठी एमएसपी निश्चित केला जाईल.
- गृह ज्योती योजनेतून 200 युनिट मोफत वीज दिली जाणार.
भाजपने जाहीर केला जाहीरनामाही :भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकासाठी सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यादरम्यान भाजपने समान नागरी संहिता (UCC) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासह भाजपने नागरिकांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासह नागरिकांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचेही आश्वासन भाजपने दिले आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये नागरिकांना आश्वासने देण्याची स्पर्धा लागल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा - Intelligence Report On Moist : नक्षलवाद्यांनी विचारधारा टिकवण्यासाठी घेतली विविध संघटनांची मदत, गुप्तचर विभागाच्या अहवालात खुलासा