विजयनगर (कर्नाटक): विजयनगर जिल्ह्यातील कुडलिगी तालुक्यातील कन्नबोरन्याना हट्टी येथे गुरुवारी एकाने महिलेचा शिरच्छेद केला. एवढेच नाही तर तिचे छाटलेले मुंडके घेऊन तो पोलिस ठाण्यात गेला. निर्मला (२३) या नर्सिंग विद्यार्थिनीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी भोजराजला अटक करण्यात आली आहे.
प्रियकराने केला प्रेयसीचा शिरच्छेद, आरोपी भोजराज गेल्या दोन वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. भोजराजने निर्मलाच्या पालकांशी संपर्क साधला. तिच्याशी लग्न करण्याची मागणी त्यांना घातली. मात्र, निर्मलाच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव फेटाळला. दोन महिन्यांपूर्वी भोजराजने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. मात्र त्याचा जीव निर्मलावरच होता.
ही तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तीन दिवसांपूर्वीच परीक्षेच्या अभ्यासासाठी ती गावी आली होती. अचानक भोजराजने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर वार केले. हत्याराने तिचे मुंडके कापून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने शीर दुचाकीवरून कानाहोशहळ्ळी पोलिस ठाण्यात आणले आणि पोलिसांना शरण आला. या घटनेने गावातील लोक भयभीत झाले आहेत. याप्रकरणी कान्होसहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - Sex Racket in Karad :बांग्लादेशातून मुली आणून कराडमधील लॉजवर देहव्यापार, तेलंगणा पोलिसांच्या कारवाईने पर्दाफाश