बेळगाव (बंगळुरू) - मुसळधार पावसाने बेळगाव जिल्ह्यातील बादाला अंकालगीमध्ये हाहाकार झाला आहे. पावसाने घर कोसळल्याने तीन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घर कोसळल्याची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बलकर या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यांनी मदतकार्यासाठी तातडीने सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा-यंदा नवरात्रीचा सण आठ दिवसांचा; पंचागकर्त्यांनी 'हे' सांगितले कारण
ही आहेत मृतांची नावे
1) गंगाव्वा भिमाप्पा खनागवी - वय-50
2) सत्याव्वा अर्जुन खनागवी- वय-४५
3) पुजा अर्जुन खनागवी - वय-8