महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 17, 2022, 7:14 PM IST

ETV Bharat / bharat

Karnataka : पावसामुळे शाळेत अडकलेल्या 150 विद्यार्थ्यांची सुटका

मुसळधार पावसामुळे नाला तुडुंब भरल्याने जिल्ह्यातील एका गावातील सरकारी हायस्कूलमध्ये अडकलेल्या 150 विद्यार्थ्यांची गुरुवारी ( 150 students rescued ) सुटका करण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास पाऊस सुरू झाला आणि धारवाड जिल्ह्यातील अमगरगोळ गावातील शाळेत विद्यार्थी अडकले होते.

Karnataka
Karnataka

धारवाड : गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाला ओव्हरफ्लो झाल्याने जिल्ह्यातील एका गावातील सरकारी हायस्कूलमध्ये अडकलेल्या 150 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश ( Success in saving 150 students ) आले. दुपारी तीनच्या सुमारास पाऊस सुरू झाला आणि धारवाड जिल्ह्यातील अमगरगोळ गावातील शाळेत विद्यार्थी अडकले. शिक्षक आणि विद्यार्थी घरी परतण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. संततधार पावसामुळे नजीकच्या नाल्याला पूर आला. ज्यामुळे शाळा एखाद्या बेटासारखी दिसू लागली.

मुलांना त्यांच्या वर्गखोलीत ठेवायला शिक्षकांना त्रास झाला. बेलवतगी पंचायत विकास अधिकारी शिवानंद हम्पीहोली यांनी सांगितले की, मुलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकारी शिक्षकांच्या संपर्कात होते आणि मुलांना पाण्यात न उतरवण्याच्या सूचना देत होते, ज्यांची पातळी चिंताजनकरित्या वाढत होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर रात्रीपर्यंत शाळकरी मुले आणि शिक्षकांची सुटका ( Release of children and teachers ) करण्यात आली. पीडीओ शिवानंद यांनी सांगितले की, स्थानिक लोक, पोलीस आणि ग्रामपंचायत अधिकारी बचाव कार्यात सहभागी झाले होते.

हेही वाचा -Dharma Sabha in Raipur: मी धर्मासोबत उभा आहे आरएसएस अन् मोहन भागवत यांच्यासोबत नाही -स्वामी निश्चलानंद सरस्वती

ABOUT THE AUTHOR

...view details