लखनऊ (उत्तर प्रदेश) - कारगिल विजय दिन आज देशभरात साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील कॅप्टन मनोज पांडे हे या युद्धात शहीद झाले. कारगिल दिनाच्या निमित्ताने त्यांचे वडिल गोपीचंद पांडे म्हणाले, की 'कारगिल युद्ध हे जगाच्या सर्वात कठीण युद्धांपैकी एक होते. जेथे शत्रूला मोठा फायदा होतो. पण भारतीय सैन्याने जोरदार झुंज दिली आणि आमच्या शिखरावर हक्क सांगितला'.
'माझ्या मुलाचा मला अभिमान'
'मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. लष्करातील एक सैनिक म्हणून त्याने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. मला अभिमान आहे, की माझ्या मुलाने आपल्या मातृभूमीसाठी आपले प्राण दिले आणि अनेकांसाठी प्रेरणा बनला', असे गोपीचंद पांडे यांनी म्हटले.
यूपी सैनिक शाळेला मनोज पांडेंचे नाव
'माझ्या मुलाने संपूर्ण देशाचा अभिमान बाळगला. त्याने लष्करातील एक सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्णपणे निभावली. हे सांगताना आनंद होतोय, की उत्तर प्रदेश सैनिक शाळेचे नाव शहीद कॅप्टन मनोज पांडे याच्याच नावावरून ठेवले आहे', असेही पांडे यांनी म्हटले. तसेच, 1999 च्या कारगिल युद्धाची आठवण करून देताना पांडे म्हणाले, की 'परिस्थिती अतिशय वाईट होती. कारण दहशतवाद्यांनी आमच्या पर्वतांच्या शिखरावर बंकर बनवले होते'.
कारगिल युद्धात 527 जवान शहीद
'ते आमच्या सैन्यावर वरून हल्ला करत होते. पण आमच्या सैनिकांनी सर्व प्रयत्न केले आणि आमचे डोंगर, जमीन पुन्हा मिळविली. यात तब्बल 527 लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे आढळले', असेही पांडे म्हणाले.