लखनौ (उत्तर प्रदेश):काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिला ( Kapil Sibal resigns from Congress ) आहे. त्यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) पाठिंब्याने लखनौमध्ये बुधवारी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला ( Sibbal Files RS Nomination From SP ) आहे. सिब्बल यांनी लखनौमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सिब्बल हे ४ जुलै रोजी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. "मी १६ मे रोजी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता," असे त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगितले. "मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. देशात स्वतंत्र आवाज असावा अशी माझी नेहमीच इच्छा आहे. विरोधी पक्षात राहून, आम्हाला युती करायची आहे. जेणेकरून आम्ही मोदी सरकारला विरोध करू शकू," असेही ते पुढे म्हणाले.