'ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती' कंगनाच्या वक्तव्यावर संजय राऊत आणि वरुण गांधींचा संताप - अभिनेत्री कंगना रणौत
कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आली आहे. यावेळी तिने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य वरून देशासाठी शहिद झालेल्या शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. कंगनाच्या विरोधात राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत.
'ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती' कंगनाच्या वक्तव्यावर संजय राऊत आणि वरुण गांधींचा संताप
मुंबई -भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले', अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगणा रनौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगणाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे. कंगणाला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. भाजपा नेते वरूण गांधी यांनी देखील कंगणावर टीका केली आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत तिच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.