चैन्नई -अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष पदाच्या निडवणुका पार पडल्या असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल त्यांच्या मावशी डॉ. सरला गोपालन यांनी आनंद व्यक्त केला. कमला हॅरिसने तिला जे करायचे होते, ते साध्य केले, असे त्या म्हणाल्या.
कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी विराजमान होणार मी डॉक्टर असून मी चंदीगडमध्ये असते. कमलाने चंदीगड इतर ठिकाणी बर्याच वेळा भेट दिली आहे. आम्ही नेहमीची तिला एक गुणी मुलगी म्हणून पाहिले आहे. ती जे काही करायची त्यात ती उत्तम होती. तिला जे हवे होते. तिने ते साध्य केले आहे, असे त्या म्हणाल्या. कमला हॅरिस'च्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याची आशा असल्याचे डॉ. गोपालन म्हणाल्या.
डॉ . सरला गोपालन एका स्वयंसेवी आरोग्य सेवेत वरिष्ठ सल्लागार आहेत. कमला यांच्या आई श्यामला गोपालन यांच्या त्या लहान बहीण आहेत. श्यामला गोपालन या मूळच्या तामिळनाडूतील होत्या. मात्र, शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या होत्या.
कमला हॅरिस यांच्या विजयाचा भारतातही जल्लोष -
कमला हॅरिस यांच्या विजयानंतर भारतातील तामिळनाडूच्या थुलसेंद्रपुरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी दारासमोर रांगोळ्या काढल्या. तसेच राज्यमंत्री आर. कामाराज यांनी थुलसेंद्रपुरमधील मंदिरात प्रार्थना केली. थुलसेंद्रपुरमधील हे कमला यांच्या आजोबांचे (आईचे वडिल) मूळ गाव आहे. गावकऱ्यांनी अतिषबाजी करत कमला यांचा विजय साजरा केला. रस्त्यांवर पोस्टर लावून आणि फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. निकालापूर्वी कमला यांच्या विजयासाठी तामिळनाडूतील मूळ गावी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आली होती.