महाराष्ट्र

maharashtra

कल्याण सिंह निधन, आज अंत्यसंस्कार; अमित शहा उपस्थित राहणार

By

Published : Aug 23, 2021, 1:44 AM IST

Updated : Aug 23, 2021, 2:26 AM IST

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांच्यावर आज त्यांच्या मूळ नरौरा या गावी रामघाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Kalyan Singh
Kalyan Singh

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे 21 ऑगस्ट रोजी निधन झाले. आज त्यांच्यावर त्यांच्या नरौरा या गावी रामघाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होता. त्यांच्यावर राजधानीच्या संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एसजीपीजीआय) उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना पीजीआय लखनऊमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार केल्यानंतर काही दिवसांनी कल्याण सिंह यांना गाझियाबादच्या कौशांबी यशोदा रुग्णालयात हलवण्यात आले. ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. 3 जुलै 2021 रोजी कल्याण सिंह यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पुन्हा लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते.

अमित शहा अंत्यसंस्काराला जाणार

त्यांच्या अंतिम संस्कारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कल्याण सिंह यांचे निधन झाल्यापासून त्यांच्या पार्थिवासोबतच आहेत.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, नितीन गडकरी, अमित शहा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, मोदींनी कल्याण सिंह यांचे अंतिम दर्शनही घेतले.

Last Updated : Aug 23, 2021, 2:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details