नवी दिल्ली-सध्याच्या टप्प्यावर कोरोनाची तिसरी लाट टळता येऊ शकत नसल्याचा इशारा केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन म्हणाले, की तिसरी लाट लाट कधी व किती प्रमाणात येणार हे स्पष्ट नाही. मात्र, आपण नवीन लाटांसाठी तयार असले पाहिजे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करता लस ही अद्ययावत करण्याची गरज आहे. नव्या स्ट्रेनचा देशभरात वेगाने संसर्ग झाला आहे. ज्या पद्धतीने विषाणुचा उच्च पातळीवर संसर्ग झाला आहे, ते पाहता तिसरा टप्पा (तिसरी लाट) टाळता येणार नाही. आपण कोरोनाच्या नवीन लाटेकरिता अधिक चांगल्या पद्धतीने तयार असू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी कोरोना हा प्राण्यांमधून मानवामध्ये पसरत नसल्याचे स्पष्ट केले. कोरोना हा मानवांमधून मानवामध्ये पसरत असल्याचे पॉल यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा-ख्रिश्चन धर्मगुरुंकडून कोरोनाचे उल्लंघन करत प्रार्थना; 100 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू