महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ganpati Visarjan 2022: आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप; दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराई निघाली सासरी - Farewell to beloved Bappa today with Gauri

तीन दिवस चालणाऱ्या ज्येष्ठा गौरीचे उत्सवात आज विसर्जन ( Jyeshtha Gauri Visarjan 2022 ) केले जात आहे. शनिवारी 3 सप्टेंबरला पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी गौरी पूजनानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. पुजेत ज्येष्ठा गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैव्यद्य दाखवण्यात आला. त्यानंतर आज गौरींचे विसर्जन केले जात आहे. ( Farewell to beloved Bappa today with Gauri )

Jyeshtha Gauri Visarjan
गौराई निरोप

By

Published : Sep 5, 2022, 2:06 PM IST

गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) सुरुवात होऊन आता सहा दिवस उलटून गेले आहे. रविवारी (4 सप्टेंबर) पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. आज (5 सप्टेंबर) सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेतआहे. दरम्यान गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, यंदा तसे कोणतेही बंधन नसल्याने सर्वत्र विसर्जन मिरवणुका या जल्लोषात निघणार आहेत. आज गौरी-गणपती विसर्जनासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर पालिकेने जय्यत तयारी केली आहे. तसेच पुणे, नाशिक या शहरांमध्येही पालिकेकडून तलाव आणि कृत्रिम तलाव उभारत विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. आज गणपती विसर्जनासाठी ( Jyeshtha Gauri Visarjan 2022 ) मोठी गर्दी उसळण्याची शक्यता पाहता पोलीस प्रशासन सतर्क आहे. ( Farewell to beloved Bappa today with Gauri )

गौरी विसर्जनाचा मुहूर्त -शनिवारी 3 सप्टेंबर रोजी गौराईचं सोनं पावलांनी आगमन झाले. रविवारी गौरी आवाहन पार पडले. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज (5 सप्टेंबर) सोमवारी गौराईचे विसर्जन होत आहे. गौरी विसर्जनासाठी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे.

आज गौराईसह लाडक्या बाप्पाला निरोप

ज्येष्ठा गौरी विसर्जन पूजा विधी -ज्येष्ठा गौरींचे विसर्जन भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते. यावर्षी ही तिथी 5 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मुर्तीचे मुकूट हलवून गौरींना निरोप दिला जातो. त्याआधीत घरासमोर रांगोळी काढून हळदी-कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली जातात. त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे. राज्यातील विविध भागात हा उत्सव वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो.

काय आहे महत्त्व? -पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे. जेष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे त्याला जेष्ठा गौरी पूजन म्हटले जाते. ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण आहे.

हेही वाचा :Teachers Day 2022: या देशांमध्ये शिक्षक दिन 5 सप्टेंबरला नाही तर वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो

ABOUT THE AUTHOR

...view details