महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना कोरोनाचा संसर्ग ; उद्याची सू मोटो लांबणीवर

न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कोरोना संसर्ग व सौम्य ताप असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील सूत्राने सांगितले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहितीही सुत्राने दिली. सू मोटोच्या सुनावणीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसमध्ये म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

By

Published : May 12, 2021, 9:50 PM IST

Updated : May 13, 2021, 12:21 AM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सर्वोच्च न्यायालयातील सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे कोरोना व्यवस्थापनावरील दाखल केलेली सू मोटोवरील गुरुवारी होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे.

गेली काही दिवस सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ हे कोरोना व्यवस्थापनावरील सुनावणी रोज घेत आहेत. कोरोना महामारीत ऑक्सिजन, व्हेटिंलेटर अशा जीवनावश्यक साधनांचा पुरवठा व सेवा सुरळित होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्यवस्थापनाबाबत ही सू मोटो दाखल करून घेतलेली आहे.

हेही वाचा-तिसऱ्या लाटेतील मुलांना धोका : कोव्हॅक्सिनची २ ते १८ वयोगटाकरता होणार चाचणी

सू मोटोच्या सुनावणीची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार-

न्यायमूर्ती चंद्रचूड यांना कोरोना संसर्ग व सौम्य ताप असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील सूत्राने सांगितले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहितीही सुत्राने दिली. सू मोटोच्या सुनावणीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसमध्ये म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठाकडे सू मोटोशिवाय कोरोनाशी संबंधित इतर महत्त्वाच्या सुनावणीही गुरुवारी होणार होत्या. मात्र, या सुनावणी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सपाठोपाठ मारुती व टोयोटोकडून वॉरंटीत वाढ

१० मे रोजीच्या सुनावणीत आली होती तांत्रिक त्रूट

सर्वोच्च न्यायालयात कोरोना व्यवस्थापनावरील सू मोटोच्या सुनावणीत १० मे रोजी तांत्रिक त्रूट आली होती. त्यामुळे खंडपीठाने पुढील सुनावणी १३ मे रोजी घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे न्यायमूर्तींना केंद्र सरकारने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र वाचण्यासाठी अधिक मिळेल, असेही खंडपीठाने १३ मे रोजीच्या सुनावणीत म्हटले होते.

Last Updated : May 13, 2021, 12:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details