नवी दिल्ली :न्यायमूर्ती धनंजय म्हणजेच डीवाय चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश बनले ( Chandrachud Become 50th Chief Justice Of India )आहेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत पदावर राहतील. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या वडिलांनी सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सरन्यायाधीशचा सर्वात मोठा कार्यकाळ.
CJ Chandrachud : धनंजय चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींंनी दिली शपथ
मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ ( Chandrachud Become 50th Chief Justice Of India ) घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली.
धनंजय चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड 1978 ते 1985 या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. वडिलांनंतर या सर्वोच्च पदावर पोहोचलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज शपथ घेतली. पुण्यातले कन्हेरसर हे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे मूळ गाव आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 29 मार्च ते 31 ऑक्टोबर 2013 या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्याधीश म्हणून करण्यात आली होती.