महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Andhra Crime : दुहेरी हत्याकांड! लग्नाला झाले अवघे 15 दिवस; 'या' कारणामुळे केली थेट पत्नी व सासूची हत्या - सासू व पत्नीची केली हत्या

आंध्र प्रदेशातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. 14 मार्च रोजी आई-मुलीची हत्या करण्यात आली. आरोपी दुसरे कोणी नसून जावई आणि त्याचे आई-वडील आहेत. लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच अशा कारस्थानाने दोन जणांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे घडली.

Andhra Crime
हत्या

By

Published : Mar 17, 2023, 6:55 PM IST

कुरनूल (आंध्र प्रदेश) :आंध्र प्रदेशातील कुरनूल शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुरनूलमधील चिंतलमुनीनगर येथील दुहेरी हत्याकांडातील पत्नी व सासूची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पती नरपुरम श्रावणकुमार, त्याचे वडील नारापुरम वरप्रसाद आणि आई कृष्णवेणी यांना कुरनूल फोर्थ टाऊन पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण : मार्च महिन्याच्या 14 तारखेला श्रावण कुमारची पत्नी रुक्मिणी आणि तिची आई रमादेवी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. तर रुक्मिणीचे वडील व्यंकटेश गंभीर जखमी झाले. दरम्यान, दुहेरी हत्याकांडात वरप्रसाद यांचा मुलगा श्रावण, कृष्णवेणी याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती सीआय शंकरैया आणि एसआय रमैय्या यांनी गुरुवारी डीएसपी कार्यालय कुर्नूलमध्ये दिली आहे.

श्रावणकुमारचे झाले होते लग्न :नांद्याला येथील वरप्रसाद आणि कृष्णवेणी सुमारे तीस वर्षांपूर्वी कुर्नूलला आले आणि चिंतला मुनीनगर येथे स्थायिक झाले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा श्रावण कुमार हा बीटेक करत असून वर्षभरापासून तो आयसीआयसीआय बँकेच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होता. विवाहसाठी मुलगी शोधताना तो कोटा वेंकटेश, वानपर्थी येथील कुकिंग मास्टर आणि रमादेवीची एकुलती एक मुलगी रुक्मिणी यांच्या संपर्कात आला. नंतर त्या दोघांचे लग्न झाले.

अ‍ॅपद्वारे ठेवली पाळत :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावणकुमारने रुख्मिणीला एक सेल फोन भेट दिला. त्यात एक पाळत ठेवणारे अ‍ॅप स्थापित केले आणि त्याच्या ई-मेलशी लिंक केले. यावरून आरोपी श्रावणकुमारला समजले की, राघवेंद्र गौर नावाच्या तरुणाला कोणीतरी अनेकवेळा फोन करत होते, त्यामुळे त्याला संशय आला होता. दरम्यान, असे असतानाही 1 मार्च रोजी श्रावणकुमार आणि रूक्मिणी या दोघांचे लग्न झाले.

सुंता झाल्यामुळे कुटुंबीय संतापले : संसर्गामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री श्रावणकुमार पत्नीसोबत नव्हता. दरम्यान, आपल्या पत्नीच्या मोबाईलवर अ‍ॅपवर रेकॉर्ड केलेले फोन कॉल्स ऐकल्याचे त्याने आपल्या पालकांना सांगितले. रुक्मिणीवर लग्नापूर्वी अफेअर असल्याचा आरोप झाला आणि दोघांमधील भांडण वाढले. त्यानंतर श्रावणकुमारला त्याच्या सासरच्या लोकांनी हैदराबादला नेले आणि डॉक्टरांनी त्याची सुंता केली. याबाबत श्रवण कुमारचे वडील वरप्रसाद यांना वाटत होते की, मुलाची लैंगिक क्षमता कमी करण्याच्या षडयंत्रातून हे केले गेले आहे. आपली इज्जत जाईल याचा राग आला. दरम्यान, आपल्या मुलाशी चर्चा करून वरप्रसादने सर्वांना मारण्याची योजना आखली.

हत्येचा रचला कट : आरोपींनी दिनांक 10 मार्च रोजी खून करण्याची योजना आखली होती, परंतु शक्य ती झाली नाही. त्यानंतर श्रावणकुमार वनपर्थीला गेला आणि पत्नी आणि सासूला घेऊन आला. वरप्रसादने कॉलनीजवळील एका दुकानातून दोन चाकू आधीच विकत घेतले होते. रुक्मिणीला तिच्या घराच्या तळमजल्यावर थांबवल्यानंतर तिच्या पालकांना पहिल्या मजल्यावर पाठवण्यात आले. कोणीही घरी येऊ नये म्हणून कृष्णवेणीला घराबाहेर जागरुकता ठेवण्यास सांगण्यात आले होते.

पत्नी व सासूची केली हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरप्रसाद आणि श्रावण यांनी रुक्मिणीची हत्या केली. काही वेळातच वरप्रसाद पहिल्या मजल्यावर गेले आणि त्यांनी रमादेवीवर हल्ला केला. रमादेवीला वाचवताना व्यंकटेश जखमी झाला आणि कसा तरी जीव मुठीत घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. या हल्ल्यात रमादेवी यांचा मृत्यू झाला. या गोंधळात स्थानिक लोक आले. यानंतर व्यंकटेशला कर्नूल सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी तीन आरोपींना गुरुवारी सकाळी शहराच्या बाहेरील गुट्टी पेट्रोल स्टेशनवरून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : Sangli Crime : धक्कादायक! सांगलीतील जतमध्ये भरदिवसा भाजप नगरसेवकाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details